पी एम किसान योजना भौतिक तपासणी अशी करा | PM Kisan Yojana Physical Verification Start

 

पी एम किसान योजना भौतिक तपासणी अशी करा | PM Kisan Yojana Physical Verification Start

 

जे शेतकरी पी एम किसान योजना अंतर्गत लाभ घेत आहेत, म्हणजेच जे शेतकरी या योजना अंतर्गत वर्षाला 6000 रुपये मिळत आहेत, त्यांना आता पुढील 2000 रुपयांचे हप्ते मिळवण्यासाठी भौतिक तपासणी (PM Kisan Physical Verification ) करणे बंधनकारक आहे. तसेच आता या पी एम किसान योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता या पी एम किसान योजना अंतर्गत तुम्हाला PM Kisan Physical Verification Form हा भरायचा आहे. पी एम किसान योजना अंतर्गत लाभ घेत असलेले बोगस लाभार्थी शोधण्यासाठी ही भौतिक तपासणी करण्यात येत आहे .

Pm kisan yojna भौतिक तपासणी अर्जामध्ये भरावयाची माहिती

सर्वप्रथम तुमचा तालुका आणि जिल्हा लिहा, त्यानंतर तुमचे गाव, लाभार्थ्यांचे नाव, आधार क्रमांक, बँकेचे नाव, कुटुंबातील सदस्य संख्या, कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता त्या अर्जावर लिहून खालील माहिती प्रविष्ट करा.PM Kisan Physical Verification

1. या योजने अंतर्गत कुटुंब म्हणजे पती / पत्नी / १८ वर्षाखालील अपत्ये असे आहेत, त्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येतो, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत आहेत का? ही माहिती देणे
2. या मध्ये वहितीलायक क्षेत्र (हे.) फॉर्म मध्ये भरायचे आहे.
3. या योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थी हा संवैधानिक पद धारण करणारी/केलेली आजी/माजी व्यक्तीला लाभ घेता येत नाही,त्यामुळे तुम्ही हे आहात का? ते माहिती द्या.
4. या योजने अंतर्गत लाभ घेणारा लाभार्थी हा खासदार, आमदार तसेच महापौर आहे का?
5. या योजने अंतर्गत लाभ घेणारा लाभार्थी हा केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी आहेत का? यामध्ये गट ड आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून
6. या योजने अंतर्गत लाभ घेणारा लाभार्थी हा अभियंता, व्यवसायीक डॉक्टर, वकील तसेच सी.ए, आर्कीटेक्ट आहे का? ही माहिती
7. लाभार्थी हा करदाता आहे का? त्याच प्रमाणे लाभार्थ्यांनी  मागील वर्षी आयकर भरला आहे का?
8. लाभार्थी हा निवृत्ती वेतनधारक व्यक्ती आहे का? त्या लाभार्थ्यांचे निवृत्ती वेतन हे 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे का?
9. लाभार्थी हा मयत असून सुद्धा त्याला लाभ सुरू आहे का?

हे नक्की वाचा:- पी एम किसान योजना 2000 रुपये आले का, असे चेक करा 

पी एम किसान योजना भौतिक तपासणी फॉर्म कसा डाऊनलोड करायचा?

पी एम किसान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी भौतिक तपासणी फॉर्म भरावा लागणार आहे.‘PM Kisan Yojna Physical Verification fom Download PDF’

भौतिक तपासणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पी एम किसान भौतिक तपासणी फॉर्म कुठे जमा करायचा?

पी एम किसान योजना भौतिक तपासणी फॉर्म (PM Kisan Physical Verification) हा व्यवस्थितपणे भरून कृषी सेवकाकडे जमा करायचा आहे.

हे नक्की वाचा:- पी एम किसान योजना आता घरबसल्या करा ई केवायसी

पी एम किसान योजना भौतिक तपासणी लागणारी कागदपत्रे

PM Kisan Physical Verification required documents

1. बँक अकाउंट
2. आधार कार्ड
3. सातबारा
4. 8अ

वरील कागदपत्रे आवश्यक आहे.

ही माहिती इतर सर्व शेतकरी बांधवांना पोहचविण्यासाठी शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट वेळेवर जाणून घेण्याकरिता आमच्या वेबसाईट भेट देत चला.

Leave a Comment