स्वामित्व योजना डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड असे करा डाऊनलोड | Digitally Signed Property Cards Download

स्वामित्व योजना डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड असे करा डाऊनलोड | Digitally Signed Property Cards Download

 

मित्रांनो स्वामित्व(Swamitva Yojana Maharashtra) योजने अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीचे तसेच त्यांच्या घरांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे आपल्या शेत जमिनीची संपूर्ण माहिती आपल्या सातबारावर असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती जमीन आहे याची सुद्धा माहिती आता प्रॉपर्टी कार्ड वर असणार आहे. आणि हे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरी असलेले असणार आहे. तुमच्या स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डवर तुमच्या नावावर असलेली घर, बंगला, इमारत, तुमची स्थावर मालमत्ता इत्यादी माहिती नमूद केलेली असणार आहे. या स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी करिता प्रत्येक गावामध्ये ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून तुमच्या गावातील प्रत्येक घराचा नकाशा तसेच मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे.Digitally Signed Property Cards Maharashtra. आजच्या या पोस्टमध्ये आपण डिजिटल स्वाक्षरी असलेले स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड कसे काढायचे? डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड(Digitally Signed Property Cards) कसे डाउनलोड करायचे? याविषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड संपूर्ण माहिती:-

स्वामित्व योजना(Swamitva Yojana) अंतर्गत देण्यात येणारे प्रॉपर्टी कार्ड हे एक मालमत्ता पत्रक आहे. या कार्डमध्ये आपल्या जमीन किंवा प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती असते. या प्रॉपर्टी कार्ड मध्ये आपल्या गावाचे नाव तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे नाव असते. त्यानंतर आपला प्लॉट नंबर असतो त्यात प्लॉट नंबर चे क्षेत्र किती आहे ते किती चौरस मीटर मध्ये दिलेले आहे. तशीच तो प्लॉट कोणाच्या नावावर आहे, ही सर्व माहिती या प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. आणि सर्वात शेवटी या कार्डवर एक सही केलेली असते ती सही कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलेली आहे याची माहिती दिली असते.

हे नक्की वाचा:- असा करा सातबारा उतारा दुरुस्त ऑनलाईन

स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड चे फायदे:-

स्वामित्व योजना (Swamitva Yojana Maharashtra)अंतर्गत देण्यात येणारे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीयुक्त असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड आपण आपल्या प्रॉपर्टीचा पुरावा म्हणून शासकीय आणि कायदेशीर कामांकरिता सुद्धा वापरू शकतो. यामध्ये आपल्या मालमत्तांची संपूर्ण माहिती असते. या प्रॉपर्टी काळच्या अंतर्गत आपण बँकांकडून सहजपणे कर्ज घेऊ शकतो.

स्वामित्व योजना अंतर्गत डिजिटल स्वाक्षरी प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया how to download property card Maharashtra

स्वामित्व योजना(Swamitva Yojana) अंतर्गत डिजिटल साक्षरीयुक्त प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ब्राउझर किंवा दुसरे कोणतेही ब्राउझर जे तुम्ही वापरत आहात ते ओपन करा.
2. त्यामध्ये खाली दिलेली महसूल विभागाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्या.
3.महसूल विभागाची ऑफिशियल website- 
4. आता आपण या वेबसाईटवर पहिल्यांदा आलेले असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यामुळे आता आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

हे नक्की वाचा:- शॉप ऍक्ट लायसन्स असे काढा?

5. परंतु जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन पूर्ण केले असेल तर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकतात. परंतु आपण रजिस्ट्रेशन केलेले नसल्यामुळे आता या ठिकाणी New User Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
6. Regular Login” या पर्याय निवडून नोंदणी करा. आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याकरिता खालील माहिती प्रविष्ट करायचे आहे
7.  तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा रहिवासी पत्ता ही माहिती प्रविष्ट करून सेव केल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन करायचे आहे
8. लॉगिन करण्याकरिता तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन पूर्ण करून घ्या.
9. लॉगिन पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला “Digitally signed Property card” हा ऑप्शन शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
10. आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचा विभाग निवडायचा आहे. तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचे गाव किंवा  तुमचे गावच्या तहसील अंतर्गत येते ते निवडायचा आहे.
11. आता तुम्हाला CTS नंबर टाकायचा आहे. CTS म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टीशी संबंधित सगळे रेकॉर्ड या नंबरशी संबंधित असतात.
12. जर तुम्हाला हा नंबर माहित नसेल तर तुम्ही तुमचा प्लॉट नंबर टाकून तुमचा CTS नंबर शोधून त्या ठिकाणी टाकू शकतात.

हे नक्की वाचा:- रहिवासी दाखला असा काढा ऑनलाईन

13. आता वरील सर्व बाबी व्यवस्थित रित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वामीचे योजना अंतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड(Digitally Signed Property Cards Download) करायचे आहे त्याकरिता तुम्ही डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर मध्ये डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाउनलोड झालेले असेल. तुम्ही या प्रॉपर्टी कार्डची प्रिंट करून घेऊ शकतात.Download Property Card Online

अशाप्रकारे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने स्वामित्व योजना अंतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकतो.

Leave a Comment