बैल पोळा माहिती मराठी | Bail Pola 2022 Information Marathi

 

मित्रांनो श्रावण महिना हा सणांचा महिना असतो. या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येत असतात. याच महिन्यामध्ये बैलपोळा(Bail Pola) हा सण सुद्धा येत असतो. श्रावण महिन्याच्या शेवटी हा सर्जा राजाचा सण येत असतो. शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये बैल हा वर्षभर कष्ट करत असतो. त्यामुळे त्याच्यावरची कृतज्ञता बाळगणारा बैलपोळा (Bail Pola Festival Information Marathi) हा महत्त्वपूर्ण असा सण आहे. आजच्या या पोस्ट मध्ये आपण बैल पोळा 2022 (Bail Pola 2022) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

बैल पोळा माहिती मराठी | Bail Pola 2022 Information Marathi
बैल पोळा माहिती मराठी | Bail Pola 2022 Information Marathi

बैल पोळा 2022 कधी आहे? When is Bail Pola 2022?

शेतकरी बांधवांच्या दृष्टीने बैलपोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. बैलांच्या आणि शेतकऱ्यांची नाते हे आपुलकीचे नाते असते. बैल आपल्या शेतामध्ये वर्षभर कष्ट करून आपली शेतीची विविध कामे पूर्ण करून देत असतो. बैलपोळा सण आपला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. Bail pola kadhi ahe ?

 

बैलपोळा २०२२ हा श्रावण अमावस्येच्या दिवशी 26 ऑगस्ट 2022 ला शुक्रवार या दिवशी आहे.

 

 

बैल पोळा माहिती मराठी (Bail Pola Festival Information Marathi)

 

मित्रांनो आपण प्रत्येक जण शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य खात असतो. बळीराजा हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या बळीराजाला साथ देणारा त्याचा बैल असतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. बैलांसाठी ढवळा – पवळा , सर्जा- राजा, रिंगी – शिंगी ही नावे प्रसिद्ध आहेत. या सणाच्या दिवशी आपल्या शेतात वर्षभर राबराब राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. बैलपोळा(Pola marathi festival 2022) सण वर्षभरातून एकदा येत असल्यामुळे हा सण बैलांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे.Bail Pola 2022 Information Marathi

 

 

बैल पोळा सण कसा साजरा करतात?

बैल पोळा(pola festival in marathi) हा सण शेतकऱ्यांसाठी आणि बैलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे बैलाला नदीवर किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी नेऊन त्यांची स्वच्छ आंघोळ घालून दिल्या जाते. त्यांच्या शिंगाला कलर लावला जातो. त्यानंतर बैलांना चारा खायला टाकला जातो. बैलांना पोळा सणाच्या आधीच्या दिवशी आमंत्रण दिले जात असते. “आज आवतण घ्या,उद्या जेवायला या“ असे आमंत्रण हे बैलाला देण्यात येत असते. ज्या दिवशी बैल पोळा हा सण असतो, त्यादिवशी बैलाला कोणत्याही प्रकारचे काम करू दिले जात नाही. पोळ्याच्या दिवशी बैलाला विश्रांती दिला जात असते. बैल पोळ्याच्या दिवशी बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावण्यात येत असते.

 

 

हे नक्की वाचा:- शेतकरी बांधवांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई ची दुप्पट रक्कम

 

बैल पोळा या सणाच्या दिवशी प्रत्येक जण आपापल्या बैलाला वेगवेगळ्या पद्धतीने सजवत असतात. काही जण बैलांच्या अंगावर रंगाने नक्षीकाम करत असतात. काहीजण बैलांच्या अंगावर महादेव पार्वती चे चित्र काढत असतात. Bail Pola 2022 Mahiti Marathi

 

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगावर झुला घातला जातात. त्यांच्या डोक्यांना बाशिंग बांधले जातात, त्यांच्या गळ्यामध्ये घुंगराची माळ घातली जाते शिंगामध्ये खोबळे घातले जातात. दरवर्षी बैलपोळा करिता नवीन वेसण, नवीन कासरे विकत घेऊन बैलांना सजवण्यात येत असते. प्रत्येक जण आपापल्या बैलाला सजवित असतात. बऱ्याच गावामध्ये ज्यांचे बैल जास्त चांगले सजवलेले असतात, त्यांना प्राईज सुद्धा देण्यात येत असते. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणपोळीचा नैवद्य देण्यात येत असतो. बैल पोळ्याच्या दिवशी गावामध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात येते. गावामध्ये तोरण बांधले जात असते त्या तोरणाखाली बैलांना उभे करण्यात येत असते. त्यानंतर गावातील देवळात पूजा करण्यात येत असते.

 

 

हे नक्की वाचा:- पोलीस पाटील काय आहे? संपूर्ण माहिती

 

गावातील पाटलाला पोळा(pola festival) या सणाचा मान असतो. गावातील पाटील देवळात पूजा करीत असतो. त्यानंतर गावातील पाटील हा तोरण तोडत असतो व त्यानंतर पोळा(pola) हा उठत फुटतो. पोळ्या सणांच्या दिवशी बऱ्याच गावांमध्ये फुगड्या खेळल्या जातात. पोळा फुटल्यानंतर बैलांना सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या घरी आणले जात असते. त्यांची पूजा करण्यात येत असते. त्यानंतर इतरांच्या घरी बैलांना ओवाळणी करिता नेण्यात येत असते. बैलांची पूजा करून ओवाळणी घालण्यात येत असते. बैलपोळ्याच्या दिवशी मातीचे बैल बनवून त्यांची सुद्धा पूजा करण्यात येत असते.

 

 

अशाप्रकारे वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात असतो. हा सण शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. बैल पोळा या सणाविषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment