सरपंचाची निवड थेट जनतेतून; ग्रामविकास विभागाने जारी केला नवीन अध्यादेश | Sarpanch Will Now be Elected Directly from the People

सरपंचाची निवड थेट जनतेतून; ग्रामविकास विभागाने जारी केला नवीन अध्यादेश | Sarpanch Will Now be Elected Directly from the People

 

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरपंचाची निवड (Election of Sarpanch) आता थेट जनतेतून होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करून आता सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक करण्यासंबंधी नवीन शासन निर्णय काढलेला आहे. (Sarpanch Will Now be Elected Directly from the People) या बाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी केला आहे. या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

हे नक्की वाचा:- ग्राम पंचायत ऑपरेटर कसे बनायचे?

आपल्या महाराष्ट्र राज्यात यापूर्वी सरपंच(Sarpanch) या पदाची निवड ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३० नुसार ग्राम पंचायत मधून निवडून आलेल्या सदस्यांद्वारे करण्यात येत होती. परंतु आता या ग्राम पंचायत अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सरपंचाची निवड ही थेट जनतेतून (Sarpanch Will Now be Elected Directly from the People)होणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ६२, सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक

हे नक्की वाचा:- तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या कामासाठी किती निधी आला; असे पाहा.

सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता. परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ह्या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलेले आहे, त्यांनी हा सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. या नवीन ग्राम पंचायत अधिनियमद्वारे सरपंच पदाची थेट निवडणूक Direct election to the post of Sarpanch करण्याची पद्धती अवलंबिण्यात येणार आहे.

आता या नवीन ग्राम पंचायत अधिनियमद्वारे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच पोट निवडणुकीकरिता ज्या व्यक्तीला सरपंच निवडणुकीत उभे राहायचे असेल म्हणजेच सरपंच पदासाठी नामनिर्देशन करायचे असल्यास त्या व्यक्तीचे नाव हे गावातल्या मतदार यादीत असले पाहिजे. त्याच प्रमाणे ग्राम पंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे.

हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार अशी करा ऑनलाईन  

सरपंच व उपसरपंच अविश्वास प्रस्ताव:-

या नवीन ग्राम पंचायत अधिनियमानुसार सरपंच किंवा उपसरपंचांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव करता येणार नाही. त्यानंतर जर सरपंच वर अविश्वास प्रस्ताव आल्यास ग्राम सभेत शिरगणना करून सध्या बहुमताने सरपंच या पदासाठी 3 प्रस्ताव हे घेता येणार आहे. जर सरपंच(Sarpanch Election) वरील अविश्वास प्रस्तावास मंजूर झाल्यास सरपंचाचे अधिकार हे उप-सरपंचाकडे देण्यात येईल. जर ग्राम सभेत सरपंच आणि उपसरपंच या दोघांवरही अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यांचे अधिकार गट विकास अधिकारी यांच्याकडे असेल.

ग्राम पंचायत अध्यादेश download करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment