पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी | Precautions To Be Taken While Applying Crop Insurance

 

मित्रांनो सध्या पीक विमा योजना चे अर्ज सुरू झालेले आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या शेत पिकांचा पीक विमा काढत आहेत. आपण आपल्या शेती पिकांचा पीक विमा काढल्याने आपल्या शेती पिकांना सुरक्षा कवच या pik vima योजने अंतर्गत प्रदान करण्यात येत असते. त्यामुळे पीक विमा हा शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण पीक विमा अर्ज (Pik Vima Yojana Application) करताना काही काळजी घेतली पाहिजे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Kharip Pik Vima 2022, Pik Vima application 2022

 

 

पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी | Precautions To Be Taken While Applying Crop Insurance
पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी | Precautions To Be Taken While Applying Crop Insurance

 

 

 

पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी :-

 

1. पीक विमा अर्ज करण्याकरिता आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

2. पीक विमा फॉर्म भरण्याकरिता सातबारा तसेच आठ अ अपलोड करावेच लागेल. तुम्ही सातबारा, आठ अ हा तलाठी यांच्याकडील किंवा डिजिटल सुद्धा अपलोड करू शकतात.

3. पीक विमा अर्ज करताना शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपले शेत कोणत्या महसूल मंडळात येते याची पुष्टता करावी. व महसूल मंडळ हे योग्य टाकावे.

4. मयत शेतकऱ्याचा पीक विमा फॉर्म भरता येणार नाही

5. जर तुम्ही भाडेकरार वर जमीन घेतली असेल तर पीक विमा अर्ज करण्यासाठी संमती पत्र आवश्यक असते, त्यासाठी  100 रु. चा बॉण्ड आवश्यक आहे

6. शेतकरी बांधवांनी पीक विमा अर्ज करताना स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा. कारण की पीक विमा अर्ज केल्या नंतर तुम्हाला पीक विमा अर्ज केल्याची माहिती तुमच्या मोबाईल नंबर वर पाठविण्यात येते, तसेच पीक विमा क्लेम करताना सुद्धा मोबाईल नंबर ची आवश्यकता पडते.

7. पीक विमा अर्ज करताना तुम्हाला बँक पासबुक अपलोड करावे लागते. परंतु ते बँक पासबुक प्रिंटिंग केलेले पाहिजे. हाताने लिहिलेले बँक पासबुक चालत नाही. त्यामुळे ते upload करू नये.

8. सातबारा तसेच आठ अ अपलोड करायचा आहे. सामायिक जमीन असेल तर संमती पत्र upload करा.

9. पीक विमा अर्ज करताना तुमच्या बँक पासबुक, आधार कार्ड तसेच सातबारा वर तुमचे नाव हे बरोबर असले पाहिजे.

10. पीक विमा भरताना Mix cropping असल्यास पीक व्यवस्थित निवडून घ्यावे तसेच मिश्र पीक जर शेतकरी घेत असेल तर रेशो नीट टाकावा.

 

 

हे नक्की वाचा:- पीक कर्ज ऑनलाईन अर्ज सुरू

 

11. एक वेळा तुम्ही विम्याचे पेमेंट केले आणि pmfby च्या पोर्टल वरून पीक विमा पावती निघाल्यास पीक विमा अर्ज आपण रद्द करू शकत नाही.

12. शेतकरी बांधवांनी पीक विमा काढताना त्यांच्या जमिनीचा सर्व्हे नंबर तसेच खाते क्रमांक, बँकचेचा खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड हा चेक करून घ्यावा.

13. त्याच प्रमाणे ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे.

14. शक्यतो ई पीक पाहणी करून पीक विमा अर्ज करावा.

15. ज्या प्रमाणे ई पीक पाहणी केली, त्याच प्रमाणे पीक विमा काढावा. जेणेकरून पीक विमा क्लेम करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना बीड पॅटर्न काय आहे!

 

 

वरील सर्व बाबींची काळजी ही शेतकरी बांधवांनी पीक विमा भरताना घ्यायची आहे. जर ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

 

 

Leave a Comment