पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना; मिळवा 1.25 लाखांपर्यंत स्कॉलरशिप | PM Yasasvi Scholarship Yojana

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना; मिळवा 1.25 लाखांपर्यंत स्कॉलरशिप | PM Yasasvi Scholarship Yojana

 

आजच्या या पोस्टमध्ये आपण पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना “PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India (YASASVI)” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. या पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना अंतर्गत 75 हजार आणि 1 लाख 25 हजार रुपये इतकी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. त्यामुळे ही पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना काय आहे? या पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजनेची कागदपत्रे पात्रता अर्ज प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती करिता ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

 

 

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना (PM Yasasvi Scholarship Yojana)

आपल्या देशातील शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची स्थापना केलेली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ची स्थापना स्वावलंबी तसेच स्वयंपूर्ण स्वतंत्र संस्था म्हणून केलेली आहे. पीएम यशस्वी योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे. पीएम यशस्वी योजना अंतर्गत आपल्या देशातील ओबीसी तसेच ईबीसी आणि डीएनटीं प्रवर्गाला उच्च दर्जाचे शालेय शिक्षण घेण्याकरिता स्कॉलरशिप प्रदान करणारी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

 

 

हे नक्की वाचा:- दहावी पास विद्यार्थ्यांकरिता 50 हजार रुपये स्कॉलरशिप

 

 

PM YASASVI म्हणजे PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India होय. भारत देशातील प्रत्येक राज्यामध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. या पीएम यशस्वी योजने अंतर्गत जे विद्यार्थी आपल्या भारत देशामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. ही स्कॉलरशिप केवळ भारतातील अभ्यासासाठी आहे. ही स्कॉलरशिप योजना सार्वजनिक त्यामध्ये केंद्रीय राज्य तसेच स्थानिक शाळांना किंवा अनुदानित शाळा आणि खाजगी शाळा यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा देण्यात येणार आहे.

 

 

पीएम यशस्वी योजना निवड प्रक्रिया:-

पीएम यशस्वी योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या वतीने NTA वर यशस्वी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे या पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना(PM Yashasvi Scholarship Yojana) अंतर्गत निवड प्रक्रिया ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेतलेल्या प्रवेश परीक्षेत मिळालेल्या (YET) गुणवत्तेनुसार असणार आहे.

 

पी एम यशस्वी योजना परीक्षेची पद्धत:- संगणक आधारित चाचणी (CBT).

 

पी एम यशस्वी स्कॉलरशिप योजना पात्रता ( Eligibility for PM Yashasvi Scholarship Scheme)

 

1. पी एम एस एस सी स्कॉलरशिप योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 2.50 लाखांपेक्षा कमी पाहिजे.

2. पीएम यशस्वी योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराने 9 वी इयत्ता किंवा 11वी मध्ये उच्च श्रेणीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला पाहिजे. उच्च श्रेणीच्या शाळा चेक करण्याची लिंक (https://yet.nta.ac.in/schoolList/ या लिंक वर असणाऱ्या शाळा ह्या उच्च श्रेणीच्या

3. पी एम यशस्वी योजना अंतर्गत इतर मागासवर्ग (OBC), अर्ध-भटक्या जमाती (DNT) तसेच विमुक्त, भटक्या या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत आहे.

 

 

हे नक्की वाचा:- barti मार्फत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप योजना 

 

पीएम यशस्वी योजना अंतर्गत मिळणारी स्कॉलरशिप (PM YASASVI Scholarship Scheme)

 

PM YASASVI Scholarship Yojana अंतर्गत नववी तसेच दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 75 हजार रुपये प्रति वर्ष प्रति वर्ग स्कॉलरशिप देण्यात येत आहे.

 

त्याचप्रमाणे जे विद्यार्थी अकरावी आणि बारावी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना 1 लाख 25 हजार रुपये प्रति वर्ष प्रति वर्ग इतकी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या पीएम यशस्वी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप मध्ये शाळा तसेच वस्तीगृहाची फी समाविष्ट आहे.

 

 

 

पी एम यशस्वी योजना कागदपत्रे(Documents for PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India)

 

1. आधार कार्ड क्रमांक

2. उत्पन्न दाखला

3. कास्ट सर्टिफिकेट

4. मोबाईल नंबर ( चालू असणारा)

5. बँक खाते ( आधार लिंक केलेले )

 

 

पी एम यशस्वी योजना अर्ज प्रक्रिया ( Pm yasasvi yojana application process)

 

पीएम यशस्वी योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. Pm yasasvi Online Application, Apply Online For PM YASASVI

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Pm Yasasvi महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख- 27.07.2022 ते 26.08.2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणे.

अर्ज सुधारणा विंडो: 27.08.2022 ते 31.08.2022

प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे: 05.09.2022

परीक्षांच्या तारीख: 11.09.2022 (रविवार)

 

 

Pm Yasasvi Scholarship Yojana संपर्क:-

 

ईमेल आयडी : yet@nta.ac.in

वेबसाइट:-https://www.nta.ac.in,

https://yet.nta.ac.in, https://socialjustice.gov.in

Contact no: 011-69227700, 011-40759000

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

पी एम यशस्वी योजना विषयीची ही माहिती तुम्हाला आवडली आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment