पिक विमा फॉर्म चुकला, असा करा दुरुस्त | Pik Vima Form Correction

 

मित्रांनो जर तुम्ही पिक विमा चा अर्ज केलेला असेल आणि जर तुमच्या पिक विमा फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या असतील, तर त्या पिक विमा फॉर्म मधील चुका आपल्याला दुरुस्त करता येतात. Pik vima form मध्ये बऱ्याच वेळा चुका होत असतात, अशा वेळेस आपण आपल्या पीक विमा अर्जातील पीक विमा फॉर्म मधील चुका दुरुस्त करून घेतल्या पाहिजे, नाहीतर चुकीच्या पीक विमा अर्जामुळे तुम्ही पीक विमा मदत पासून वंचित राहू शकता. जर तुमच्याकडून सुद्धा पीक विमा फॉर्म मध्ये चुका झालेल्या असेल तर तुम्ही तुमचा पिक विमा फॉर्म कशाप्रकारे दुरुस्त करू शकता याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. Pik Vima form correction, Pik vima policy corrction 2022, pik vima form chukala

 

पिक विमा फॉर्म चुकला, असा करा दुरुस्त | Pik vima form correction, Pik Vima Form Correction Online
पिक विमा फॉर्म चुकला, असा करा दुरुस्त | Pik vima form correction

 

 

पीक विमा चुकलेला अर्ज दुरुस्त कसा करायचा? Pik Vima Form Correction

पिक विमा फॉर्म करेक्शन करण्यासाठी तुम्हाला एक लिंक देण्यात येणार आहे. त्या लिंक वर क्लिक करून आपण आपला पिक विमा चा फॉर्म दुरुस्त करू शकतो म्हणजे पिक विमा फॉर्म मधील झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन बदल त्यामध्ये करू शकतो.Pik vima form Correction Process. पिक विमा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी Google Doc या ची लिंक देण्यात येणार आहे या Google Doc च्या लिंकच्या माध्यमातून आपण चुकलेला पिकण्याचा फॉर्म रिव्हर्ट करू शकतो तसेच रिजेक्ट सुद्धा करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पिक विम्याची अर्जामध्ये बदल करायचा असेल किंवा चुका दुरुस्त करायची असेल तर घाबरून जाण्याची कोणतेही कारण नाही. आपण सहजरीत्या पीक विम्याच्या झालेल्या चुका दुरुस्त करू शकतात.Pik vima form correction, Pik Vima Form Correction Online

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा अर्ज चुकणार नाही, पीक विमा अर्ज करताना घ्यावयाची काळजी

 

 

Google Doc च्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची माहिती ही सबमिट करायची आहे. तेव्हाच तुम्ही तुमचा पिक विमा अर्ज हा रिजेक्ट किंवा रिव्हर्ट करू शकतात.Crop insurance policy Correction Link

 

 

पिक विमा योजना चुकलेला अर्ज दुरुस्त करण्याची प्रोसेस:-

 

मित्रांनो जर तुमच्या पिक विमा अर्ज भरताना चुकी झाली असेल तर तुम्ही तुमच्या पिक विमा अर्ज मध्ये दुरुस्ती करू शकतात. पिक विमा अर्ज दुरुस्त करण्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस पूर्ण करावी.

 

1. पिक विमा चुकलेला अर्ज दुरुस्त करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही ज्या सीएससी कडून अर्ज केलेला आहे त्यांची माहिती प्रविष्ट करावी लागते. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या सीएससीचा आयडी नंबर द्यायचा आहे. त्यानंतर तुमचे पूर्ण csc vle नाव टाकायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून csc vle आहात, तू जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेल्या ची माहिती म्हणजेच तुम्ही कोणत्या csc vle मधून अर्ज केला याची माहिती टाकलेली आहेत.

2. आता तुम्हाला तुम्ही पिक विम्याचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला सीएससी सेंटर धारकाने एक पावती दिलेली असेल. म्हणजेच पिक विमा अर्ज केल्याची पावती होय. या पिक विमा अर्जाच्या पावती मध्ये तुम्हाला तुमचा 21 अंकाचा एप्लीकेशन नंबर दिसेल, तो एप्लीकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे.

3. आता पुढील प्रक्रियेमध्ये तुम्हाला ज्या शेतकरी बांधवांच्या अर्जामध्ये चुकी झालेली आहे त्यांचे नाव व त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हा प्रविष्ट करायचा आहे.

4. आता तुम्हाला पिक विम्याच्या अर्जामध्ये कोणता बदल करायचा यासाठी दोन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन म्हणजे पॉलिसी रिव्हर्ट करायची आहे किंवा पॉलिसी रिजेक्ट करायचे आहे हे निवडावे लागेल.

5. आता तुम्ही जे काही करणार आहात त्याचे कारण तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागेल. म्हणजेच तुम्ही पॉलिसी रिजेक्ट करणार आहात किंवा पॉलिसी रिव्हर्ट करणार आहात याचे कारण तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे.

6. या ठिकाणी तुमच्या कारणांमध्ये जर तुमचे चुकीचे पीक टाकण्यात आलेले असेल, किंवा तुम्ही चुकीचा बँक अकाउंट नंबर टाकला असेल किंवा शेतकरी बांधवांचे नाव हे चुकलेले असेल किंवा तुमच्या शेताचा गट नंबर किंवा सर्वे नंबर चुकलेला असेल किंवा इतरही काही चुका असल्यास तुम्हाला ते कारण या ठिकाणी टाकायचे आहे.

7. आता या ठिकाणी खाली तुम्हाला csc vle चा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. आणि खाली दिलेल्या घोषणा मान्य आहे याकरिता स्वयंघोषणापत्र द्यायचा आहे.

8. आता हा पिक विमा अर्ज दुरुस्तीचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे.

9. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म चा रिप्लाय येणार आहे.

10. आता तुम्ही जर फॉर्म रिजेक्ट केला असेल तर तुमच्या पीक विमा चुकीच्या फॉर्म ला रिजेक्ट केले जाईल. जर तुम्ही फॉर्म हा रिव्हर्ट केला असेल तर तुमच्या फॉर्म ला रिव्हर्ट केलं जाईल.

11. आता तुम्ही पुन्हा एकदा तुमचा पिक विमा अर्ज नव्याने भरू शकतात.

12. जर तुम्ही तुमचा पिक विमा फॉर्म रिजेक्ट केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट केले जातात. शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे हे 2 महिन्यात जमा केले जातात.

 

 

हे नक्की वाचा:- पीक विमा योजना बीड पॅटर्न काय आहे? संपूर्ण माहिती

 

अशाप्रकारे तुम्ही जर तुमचा पिक विमा अर्ज हा चुकलेला असेल तर तुमच्या पिक विमा अर्ज मध्ये बदल करू शकतात किंवा तुम्ही तुमचा पिक विमा अर्ज हा रिजेक्ट सुद्धा करू शकतात. शेतकरी मित्रांनो पिक विमा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै पर्यंत आहे त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत पिक विमा अर्ज केलेला नसेल तर तुम्ही पिक विमा अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावा.

 

पीक विमा अर्ज दुरुस्ती लिंक

 

पीक विमा अर्ज करताना खालील चुका होऊ शकतात :-

पिक विमा अर्ज करताना शेतकरी बांधवांच्या नावात चुका होऊ शकतात, त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त जमिनी असतील तर  पिक विमा अर्ज करताना सर्वे नंबर सुद्धा चुकू शकतो. किंवा तुम्ही ज्याप्रमाणे ई पीक पाहणी केली आहे त्याप्रमाणे पिक विमा अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही वेगळे पीक टाकलेले असेल तर. शेतकरी बांधवांचा बँक अकाउंट नंबर चुकीचा असू शकतो किंवा बँक अकाउंट च्या IFSC नंबर सुद्धा चुकलेला असल्यास. किंवा बँकेचे नाव निवड करताना बँकेचे नाव चुकीचे टाकल्यास.

 

वरी सर्व चुका या पिक विमा अर्ज करताना होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पिक विमा अर्ज करताना वरील सर्व बाबींची माहिती घेऊन व्यवस्थित चेक करून पिक विमा अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुमच्या पिक विमा अर्ज मध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही.

 

आशा करतो की, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, या संबंधित काही शंका असल्यास नक्की कमेंट करा. अश्याच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment