मध केंद्र योजना महाराष्ट्र 2022 अर्ज प्रक्रिया | Madhumakshika Palan Yojana Maharashtra Mahiti Marathi

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण एका महत्वपूर्ण अशा योजने विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ती योजना म्हणजे मध केंद्र योजना महाराष्ट्र 2022 Madh Kendra Yojana Maharashtra. ही योजना काय आहे? या मध केंद्र योजना करिता लागणारी सर्व कागदपत्रे, अटी, पात्रता, कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. Madhumakshika Palan Yojana Mahiti in Marathi, madhumakshika palan yojana information in Marathi

मध केंद्र योजना महाराष्ट्र 2022 अर्ज प्रक्रिया | Madhumakshika Palan Yojana Maharashtra Mahiti Marathi
मध केंद्र योजना महाराष्ट्र 2022 अर्ज प्रक्रिया | Madhumakshika Palan Yojana Maharashtra Mahiti Marathi

 

Madh Kendra Yojana Maharashtra ही एक महत्वपूर्ण अशी योजना राबविण्यात येत आहेत. आपल्या भारत देशात मधुमक्षिका पालन या एक महत्वाचा व्यवसाय आहे. आपल्या देशात जास्तीत जास्त मधुमक्षिका पालन करण्यात यावे. त्याच प्रमाणे आपला देश हा येणाऱ्या काळामध्ये मध निर्यात करणारा देश बनावा या करिता आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य शासनाच्यावतीने मधुमक्षिका पालन याकरिता अनेक योजना राबविण्यात येत असतात. त्यामुळे आपल्या देशात मधुमक्षिका पालन हा एक महत्त्वपूर्ण असा व्यवसाय बनत आहेत. मधुमक्षिका पालन योजना ही पोक्रा योजनेच्या अंतर्गत सुद्धा राबविण्यात येत आहे. शासनाच्या अनेक योजना मध्ये मधुमक्षिका पालन योजना ही समाविष्ट करण्यात आलेली आहे. Madhumakshika Palan Yojana Maharashtra Mahiti

हे नक्की वाचा:- प्रधानमंत्री स्वणीधी योजना

मध केंद्र योजना अर्ज प्रक्रिया Madh Kendra Yojana Application Process:-

 

मध्य केंद्र योजना 2022-23 करिता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या खादी व ग्रामोद्योग महामंडळातर्फे अर्ज मागविण्यात येत आहेत. जी व्यक्ती या योजनेकरिता पात्र असतील अशा व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Madhu makshika palan yojana maharashtra

जे शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील आहेत, अशा शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं 222,  जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210053 या ठिकाणी जाऊन संपर्क करायचा आहे.

जे शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि त्या शेतकऱ्यांना जर मधुमक्षिका पालन योजने करिता अर्ज करायचा असेल तर या योजनेविषयी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय दुरध्वनी क्रमांक 02462-240674 येथे संपर्क साधावा लागेल.

अर्ज कसा करायचा:-

मधुमक्षिका पालन योजना लाभ benifits of madhumaksheeka palan yojana :-

 

मध केंद्र योजना महाराष्ट्र अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  त्याच प्रमाणे या पात्र लाभार्थ्यांकडून शासनाच्या हमीभावाने मध खरेदी करण्यात येणार आहेत त्यासंबंधी जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे.

ज्या पात्र लाभार्थ्यांची या मध केंद्र योजना अंतर्गत निवड होईल त्या लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने या योजनेअंतर्गत 50 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

हे नक्की वाचा:- वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान योजना महाराष्ट्र

मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र अटी व पात्रता (Madhu Makshika Palan Yojana Maharashtra Terms and Eligibility) :-

 

या मधुमक्षिका पालन योजना योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे लागते. त्याच प्रमाणे वैयक्तिक मधपाळ म्हणून प्रशिक्षण घ्यावे लागेल.  शेती असणाऱ्या अर्ज दारास प्राधान्य देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे अर्जदार हा किमान 10 वी पास असावा. त्याच प्रमाणे अर्ज दाराकडे स्वतःची जमीन नसल्यास भाडे तत्वावर घेतलेली जमीन असावी लागते. ही जमीन किमान १ एकर  पर्यंत असावी. त्याच प्रमाणे लाभार्थ्याकडे लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. व प्रशिक्षण केंद्र चालविण्याकरिता संस्थेकडे 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी लागते.

 

अश्या प्रकारे मध केंद्र ही एक महत्वपूर्ण अशी योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कारण की मधुमक्षिका पालन योजना हा आपल्या देशातील एक महत्वपूर्ण असा व्यवसाय बनत चालला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन करून त्यांच्या मधाचे विदेशात सुद्धा आता एक्सपोर्ट करणे चालू केले आहे. त्यामुळे भारतीय मधाला मागणी वाढणार हे नक्की.

जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment

WhatsApp Icon