Mutual Fund आणि Share Market मध्ये काय फरक आहे? What is the difference between Mutual Fund and Share Market?

 

आजच्या काळात पैसा हेच सर्वकाही आहे. त्यामुळे आपण आपला पैसा कुठे गुंतवणूक करावी. त्यामध्ये रिटर्न्स किती मिळतात. रीक्स किती आहे, आपण पैसा long-term invest करू शकतो का? या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपण आपला पैसा गुंतवला पाहिजे. त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आपण पैसा गुंतवणूक करणाऱ्या mutual fund आणि share market या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Mutual Fund आणि Share Market मध्ये काय फरक आहे? त्यामुळे आपण mutual fund मध्ये गुंतवणूक करायची की? Share market मध्ये करायची? या विषयी तुम्हाला कल्पना येईल.

 

 

Mutual Fund आणि Share Market मध्ये काय फरक आहे? What is the difference between Mutual Fund and Share Market? शेअर बाजार आणि म्युचुअल फंड यामधील फरक
Mutual Fund आणि Share Market मध्ये काय फरक आहे? What is the difference between Mutual Fund and Share Market?

 

 

 

आपल्याकडे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आपण दोन पद्धतीने शेअर बाजारात पैसे गुंतवू शकतो. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्याची पहिली पद्धत म्हणजे थेट शेअर मार्केट मध्ये इक्विटीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे. आणि शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून पैसा गुंतवणूक करणे होय.

 

 

हे नक्की वाचा:- शेअर बाजार काय आहे?

 

शेअर बाजार आणि म्युचुअल फंड मध्ये काय फरक आहे? What is the difference between a stock market and a mutual fund? :-

 

शेअर बाजार आणि म्युचुअल फंड यामधील फरक आपण एका सोप्या उदाहरण च्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या जेवणात वांग्याची भाजी करायची असेल. तर आपल्याकडे वांग्याची भाजी करण्याचे दोन पर्याय आहेत. आपण आपल्या शेतात स्वतः वांग्याचे पीक घेऊन त्या वांग्याची भाजी करू शकतो. किंवा दुसरा पर्याय म्हणजे थेट बाजारातून वांगे विकत आणून त्याची भाजी करणे होय. यामध्ये पहिला पर्याय हा कठीण आहे, कारण की शेतात वांग्याचे पीक घेण्यासाठी खत घालणे, पाणी देणे, किडीपासून संरक्षण करणे या सर्व बाबी कराव्या लागतात. दुसऱ्या पर्यायात थेट बाजारातून आपल्या पसंतीची वांगी घेणे ते ही कोणतेही कष्ट न घेता.

 

 

शेअर बाजार आणि म्युचुअल फंड हे सुद्धा असेच आहे. शेअर बाजारात आपण इक्विटीच्या माध्यमातून थेट कंपनीचे भाग खरेदी करू शकतो. शेअर बाजारात इक्विटीच्या माध्यमातून गुंतवणूक करताना आपल्याला प्रत्येक बाबीचा प्रॉपर अभ्यास असावा लागतो. ज्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करणार आहोत, त्या कंपनीची संपूर्ण माहिती एक प्रकारे कुंडली माहीत असावी लागते. परंतु म्युचुअल फंड मध्ये आपल्याला स्वतः analysis करण्याची गरज नाही.स्टॉकची निवड ही तज्ञ फंड व्यवस्थापकाकडून केली जाते. Mutual Fund हा एक प्रकारे वेगवेगळ्या स्टॉक चा संच आहे. Mutual Fund मध्ये आपल्याला स्टॉकची निवड करण्याची गरज नाही, ही  निवड तज्ञ फंड व्यवस्थापकाकडून केली जाते. Mutual fund वर fund manager चे नियंत्रण असते. Mutual fund आणि शेअर बाजार या दोन्ही च्या माध्यमातून शेअर मार्केट मध्येच गुंतवणूक करत असतो.

 

 

हे नक्की वाचा:- Mutual Fund काय आहे?

 

शेअर बाजार गुंतवणूक करत असताना आपल्याला mutual fund च्या तुलनेत जास्त धोका असतो. शेअर बाजार गुंतवणूक करताना आपल्याला स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असणाऱ्या हजारो कंपन्या मधून काही ठराविक कंपन्या शोधून त्या कंपन्याचे proper analysis करावे लागते. आणि नंतर गुंतवणूक करावी लागते.

 

 

शेअर बाजार आणि म्युचुअल फंड यामधील एक महत्वाचा फरक म्हणजे जर तुम्हाला एकाधा शेअर खरेदी करायचा असेल आणि जर त्या शेअर ची किंमत ही 90 हजार रुपये असेल आणि आपल्याकडे तेवढे पैसे नसेल तर आपण तो शेअर खरेदी करू शकत नाही. आणि जर तुम्ही हीच mutual fund मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला असे अनेक शेअर्स असणारे mutual fund मिळतील. परंतु तुम्ही mutual fund च्या माध्यमातून त्या शेअर मध्ये डायरेक्ट गुंतवणूक केलेली नसेल. परंतु तुमच्या mutual fund मध्ये जर तो शेअर असेल तर तुम्ही mutual fund मध्ये गुंतवणूक केलेल्या पैशाचा काही भाग हा तुमच्या त्या शेअर मध्ये असेल.

 

अश्या प्रकारे म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केट या मध्ये काय फरक आहे, हे आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतले आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा. अशाच पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.  ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. 

 

Leave a Comment