बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? Bandhkam Kamgar Yojana Online Registration

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी बांधकाम कामगार योजना ही राबविण्यात येत आहे. या बांधकाम कामगार योजना अंतर्गत या कामगारांची नोंदणी करण्यात येत असते. त्या नंतर या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध बांधकाम योजनांचा लाभ हा देण्यात येत असतो. या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ हा थेट देण्यात येत असल्यामुळे, बांधकाम काम करीत असलेल्या कामगारांनी या बांधकाम कामगार योजना नोंदणी Bandhkam Kamgar Yojana Online Registration हे करून घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांना बांधकाम कामगार म्हणून शासन दरबारी नोंदणीकृत केले जाते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी काय आहे? बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची? बांधकाम कामगार नोंदणी कागदपत्रे? बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन प्रक्रिया तसेच बांधकाम कामगार नोंदणी ऑफलाईन प्रक्रिया? या विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. Bandhkam Kamgar Yojana Nondani,

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? Bandhkam Kamgar Yojana Online Registration Bandhkam Kamgar Yojana Online Nondani
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? Bandhkam Kamgar Yojana Online Registration

बांधकाम कामगार योजना उद्देश आणि उद्दिष्टे Bandhakam Kamgar Yojana Objectives

 

बांधकाम कामगारांची नोंदणी Bandhkam Kamgar Registration करून बांधकाम कामगारांची माहिती एकच ठिकाणी मिळवून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण करणे. बांधकाम कामगार यांच्याकडून माहिती गोळा करणे, बांधकाम कामगार यांच्या पर्यंत पोहचणे. बांधकाम कामगार यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे. शासनाच्या योजने संबंधित माहिती उपलब्ध करून देणे. त्याच प्रमाणे बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या लाभाची प्रक्रिया ही सुटसुटीत तसेच सुलभ करून देणे.

बांधकाम कामगारांची नोंदणी Bandhakam Kamgar Nondani ही वाढली पाहिजे, याकरिता योग्य ते पाऊल उचलणे, जसे की ज्या ठिकाणी बांधकाम कामगार काम करतात. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करून देणे. बांधकाम कामगार यांना लाभ देण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची रक्कम हे थेट कामगाराच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करणे. त्याच प्रमाणे या बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक देणे.

 

बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना

 

बांधकाम कामगार यांना खालील विविध कल्याणकारी योजनांचा (Bandhkam Kamgar Kalyankari Yojana) लाभ हा देण्यात येत असतो. त्या योजना खाली दिलेल्या आहेत. या खालील योजनांमध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.

1.आरोग्यविषयक योजना
2.सामाजिक सुरक्षा योजना
3.आर्थिक योजना
4.शैक्षणिक योजना

हे नक्की वाचा:- बांधकाम कामगारांकरिता तीन नवीन योजना सुरू, पहा अर्ज प्रक्रिया

बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Documents for registration of construction workers

बांधकाम कामगार नोंदणी करण्याकरिता खालील कागदपत्रे  (Bandhakam Kamgar Nondani Documents) सादर करावी लागतात.

1. बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म – V
2. रहिवासी दाखला
3. ओळखीचा पुरावा
4. वयाचा पुरावा
5. बांधकाम क्षेत्रात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज 3 फोटो

बांधकाम कामगार नोंदणी फी (Bandhkam Kamgar Nondani Fee)

बांधकाम कामगार नोंदणी करिता फी 25₹ व वार्षिक वर्गणी 60₹ Bandhakam Kamgar Registration Fee

हे नक्की वाचा:- वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान योजना

 

बांधकाम कामगार नोंदणी पात्रता निकष:-

बांधकाम कामगार नोंदणी (Bandhkam Kamgar Yojana Nondani Online) नोंदणी करण्याकरिता बांधकाम कामगाराचे वय आहे 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असायला पाहिजे. जर तुम्ही या वयात बसत असाल तर तुम्ही नोंदणीसाठी पात्र आहात. त्याचप्रमाणे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारांनी मागील एका वर्षामध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस म्हणजे तीन महिने बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असले पाहिजे.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी Bandhkam Kamgar Online Nondani Process :-

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करायची असल्यास खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

सर्वप्रथम या खालील लिंक ला ओपन करा.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी लिंक

ही बांधकाम विभागाची official वेबसाईट आहे. आता ही वेबसाईट ओपन झाल्यावर एक नवीन dashbord हा ओपन झालेला असेल. आता नजीकचे डब्ल्यूएफसी स्थान निवडून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक मध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि खाली तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर “Proceed to Form” ह्या ऑप्शन वर क्लिक करा.

आता तुमच्या समोर नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल. तो म्हणजे “New BOCW Registration” ह्या ऑनलाईन मध्ये तुम्हाला तुमची खालील माहिती ही प्रविष्ट करायची आहे.

1. पर्सनल डिटेल
2. कौंटुबिक माहिती
3. कायमचा पत्ता
4. बँक डिटेल
5. बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचा तपशील
6. नियोक्ता तपशील

आता तुम्हाला तुमचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो हा अपलोड करायचा आहे. त्या नंतर वर दर्शविलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे. आता चेक बॉक्स घोषणापत्र वर क्लिक करून फॉर्म सबमिट करा. आता तुम्ही बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी (Bandhkam Kamgar Yojana Online Registration) केली आहे. आता तुम्हाला एक नंबर मिळेल. तो तुम्हाला जवळच्या कामगार केंद्रात जाऊन द्यायचा आहे.

 

बांधकाम कामगार ऑफलाईन नोंदणी Bandhkam Kamgar Offline Nondani:-

बांधकाम कामगार नोंदणी ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करता येते. त्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज हा व्यवस्थितपणे भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून. तुमच्या जवळील बांधकाम कामगार केंद्रात जाऊन जमा करायची आहे. त्यानंतर त्या केंद्रातून तुमची ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून दिल्या जाते.

 

बांधकाम कामगार नूतनीकरण ( Bandhakam Kamgar Renewal:-

Bandhakam Kamgar Nondani झालेली असेल. तर तुम्हाला पुढच्या वर्षी ते renewal करावे लागते. त्यामुळे renewal करण्याकरिता

Renewal link

या लिंक वर क्लिक करा. आता तुमचा यापूर्वी नोंदणी केल्याचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करून “Proceed to Form” या पर्याय वर क्लिक करा. आता तुम्हाला खालील सर्व माहिती ही व्यवस्थितपणे भरायची आहे. त्यानंतर Bandhkam Kamgar Renewal अर्ज हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचे बांधकाम कामगार नूतनीकरण होऊन जाईल.

ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईट वर भेट देत चला.

Leave a Comment