गूगल फॉर्म काय आहे? Google Form कसा तयार करायचा? Google Form Information In Marathi

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण Google Form काय आहे? गुगल फॉर्म कसा तयार करायचा? तसेच आपण किती प्रकारचे गूगल फॉर्म तयार करू शकतो? तसेच Google Form चे फायदे तसेच गूगल फॉर्म चा वापर आपण कोणत्या गोष्टी करिता करू शकतो? या विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. गुगल फॉर्म माहिती मराठी Google Form Information In Marathi

 

गूगल फॉर्म काय आहे? Google Form कसा तयार करायचा? Google Form Information In Marathi
गूगल फॉर्म काय आहे? Google Form कसा तयार करायचा? Google Form Information In Marathi

 

गुगल फॉर्म काय आहे? (What is Google Form in Marathi) :-

Google Form ही एक महत्वपूर्ण अशी सेवा आहे, ज्या द्वारे आपण वापरकर्त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने Google form तयार करून जमा करू शकतो. Google Form ही Google कंपनी तर्फे पुरविण्यात येत आलेली मुफ्त सेवा आहे. गूगल फॉर्म द्वारे आपण कोणतीही माहिती संकलित करू शकतो. यामध्ये आपण images सुद्धा संकलित करू शकतो. ही सर्व माहिती जी आपण Google Form द्वारे संकलित करत आहोत,ती गूगल ड्राईव्ह मध्ये सेव्ह होत असते. Google Form Mahiti Marathi, Google form information in marathi

हे नक्की वाचा:- UPI म्हणजे काय? ते कसे वापरायचे? 

गुगल फॉर्म अंतर्गत आपण विविध प्रकारची माहिती गोळा करू शकतो. आपण गूगल फॉर्म द्वारे कश्या करायच्या माहिती संकलित करू शकतो याचे उदा; जर तुम्ही tuition क्लासेस चालवत असाल आणि तुम्हाला नवीन ऑनलाईन बॅच चालू करायची असल्यास तुम्ही नवीन बॅचेस साठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गूगल फॉर्म च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची माहिती संकलित करू शकतो. तुम्ही Google Form तयार करून विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करू शकतात. ज्या द्वारे तुम्हाला समजेल की नवीन बॅचेस साठी इच्छुक विद्यार्थी किती आहेत, तसेच ते विद्यार्थी कोणत्या गावातील आहेत? तसेच या विद्यार्थ्यांनी एडमिशन करण्यासाठी पेमेंट केल्या नंतर तुम्ही गूगल फॉर्म द्वारे पैसे पेड केल्याचा स्क्रीनशॉट मागवून त्यांची एडमिशन यशस्वी रित्या निश्चित करू शकतात.

Google Form बनविण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. तसेच गूगल फॉर्म द्वारे माहिती संकलित करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सेक्युर आहे. हा फॉर्म ज्यांनी फॉर्म बनविला आहे, ते त्याला modify करू शकतात. आपल्याला हवा त्या पद्धतीने आपण त्या Google Form ला बनवू शकतो.  Google form तयार करायचा असल्यास तुमच्या जसे Gmail account असले पाहिजे.

गुगल फॉर्म अंतर्गत आपण खालील प्रकारचे फॉर्म बनवू शकतो :-

 

1. Contact Form:- एकाद्याची माहिती घेण्यासाठी कॉन्टॅक्ट फॉर्म बनवू शकतो.
2. Feedback Form:- तसेच तुम्हाला तुम्ही दिलेल्या सेवा बद्दल ग्राहकांकडून माहिती मिळवायची असल्यास ते आपण फीडबॅक फॉर्म अंतर्गत मिळवू शकतो.
3. Online Survey Form:- जर तुम्हाला एकाध्या बाबीचा सर्व्हे करायचा असल्यास तुम्ही Google Form ची मदत घेऊ शकतात.
4. Bio Data Form :- आपण वेगवेगळ्या कामांसाठी bio data मिळवीत असतो. परंतु त्या वेळेस आपल्याला ते प्रिंट करावे लागतो. आणि प्रत्यक्ष भेटून मिळवावा लागतो. हीच प्रक्रिया आपण Google Form च्या माध्यमातून करू शकतो.
5. Online Job Form :- आपल्याला कामासाठी मुलगा पाहिजे असल्यास आपण ऑनलाईन गूगल फॉर्म बनवून तुम्हाला जश्या प्रकारचा उमेदवार पाहिजे त्या पद्धतीने जॉब करिता गूगल फॉर्म बनवू शकतो.
6. Online selling:- जर तुम्ही कोणतेही पॉडक्ट उत्पादित करत असाल आणि ते तुम्हाला सेल करण्यासाठी तुम्हीं गूगल फॉर्म द्वारे माहिती तसेच पेमेंट स्लीप संकलित करून तुमचे प्रॉडक्ट सेल करू शकतात.

हे नक्की वाचा:- इंटरनेट म्हणजे काय? ते कसे काम करते

आपण महत्वपूर्ण असलेले Google Form चे सहा प्रकार पाहिले आहेत, या व्यतिरिक्त अनेक अशी कामे आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही गूगल फॉर्म बनवून माहिती संकलित करू शकतात.

Google Form चे फायदे काय आहेत? What are the benefits of Google Form in Marathi? :

1. Google Form क्रिएट करणे अगदी सोपे आहे.
2. Google Form बनविणे फ्री आहेत.
3. Google Form मध्ये आपण आपल्या गरजे नुसार customization करू शकतो.
4. ह्या मध्ये आपल्याला सर्व गोष्टी मुफ्त असून गूगल ड्राईव्ह च्या मदतीने आपण Google Form क्रिएट करू शकतो.
5. ह्या मध्ये आपण theme add करून या फॉर्म ला desine करू शकतो.


हे नक्की वाचा:- Google pay काय आहे? Google pay द्वारे ऑनलाईन पैसे कसे पाठवायचे

 

गुगल फॉर्म तयार करण्याची प्रोसेस(How to create google form):-

Google Drive चा वापर करून Google Form बनविण्याची पद्धत आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत. ती खलील प्रमाणे आहेत.

 

1.  Google Drive वरून ऑनलाईन Google Form बनविण्यासाठी तुमच्याकडे एक Gmail id असणे आवश्यक आहे.
2.  गुगल फॉर्म तयार करण्यासाठी सर्वप्रथम गूगल ड्राईव्ह ओपन करा. त्यामध्ये न्यू या ऑप्शन वर क्लिक करा.
3. त्यामध्ये तुम्हाला Google Form हा पर्याय शोधायचा आहे.
4. आता Google Form हा पर्याय वर क्लिक करा.
5. आता गूगल फॉर्म पर्याय वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक  Blank Form ओपन झालेला असेल.
6. आता तुमच्यासमोर गूगल फॉर्म बनवण्यासाठी खूप पर्याय येतील त्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचा गूगल फॉर्म हवा त्या पद्धतीची माहिती भरा. त्या नंतर तुमचा गूगल फॉर्म तयार होईल. how to creat Google Form in Marathi

Leave a Comment