फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ | Ful Sheti Anudan Yojana Maharashtra 2022

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण मनरेगा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र २०२२(Ful Sheti Anudan Yojana 2022 ) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फुल शेती करण्यासाठी लाख रु. पर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजने अंतर्गत अटी , पात्रता, अनुदान, लागणारी कागदपत्र, लाभ घेण्यासाठी प्रक्रिया या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

 

फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ | Ful Sheti Anudan Yojana Maharashtra 2022
फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ | Ful Sheti Anudan Yojana Maharashtra 2022

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यात फुल शेती अनुदान योजना सुरू करण्याकरिता परिपत्रक काढून या ful sheti anudan yojana साठी मंजुरी दिलेली आहे. सदर फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबविल्या जात आहेत . या योजने अंतर्गत मोगरा, निशिगंधा, गुलाब अश्या फुल पिकांची शेती करण्यात येणार आहे. आता या योजने मुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात फुल शेती बहरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शेतात फुल शेती करायची असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात. या योजने अंतर्गत शेतात फुल शेती करण्यासाठी प्रती मनुष्य २५६ रू प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

 

फूल शेती अनुदान योजना(Ful sheti Anudan Yojana) लाभार्थी पात्रता :-

 

सदर फूल शेती अनुदान योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राबविल्या जात आहेत. त्यामुळे मनरेगा अंतर्गत लाभ घेण्यासाठी जे व्यक्ती पात्र आहेत, अश्या सर्वांना या फुल शेती अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभ मिळवता येतो. या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी जॉबकार्ड असणे आवश्यक आहे. या योजना करीता लाभार्थ्याला स्वत: किंवा कुटुंबातील एखादी कार्यक्षम व्यक्ती प्रमाणीत मजुर म्हणुन घोषित करणे आवश्यक असते. या योजने अंतर्गत खडड़े खोदणे, लागवड करणे, पाणी देणे, औषधे फवारणे या प्रकारची कामे मनरेगा जॉबकार्ड धारक मजुरांकडून करून घ्यावी किंवा कुटुंबातील जी व्यक्ती मजूर बनून दाखवली आहे, अश्या व्यक्तींकडून ही कामे करून घ्यावी. अर्ज दाराकडे स्वतः ची जमीन असणे आवश्यक आहे. जर जमीन कुळ कायद्याखाली ल असेल तर कुळाची  संमती घ्यावी लागेल.

 

हे नक्की वाचा:- कुसुम सोलर पंप योजना अर्ज सुरू

 

फुल शेती अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे Documents required for ful sheti anudan yojana :-

1. सातबारा
2. आठ – अ
3. दारिद्र्य रेषेखालील दाखला
4. जातीचा दाखला
5. प्रपत्र-अ  मधील अर्ज
6. संमतीपत्र

Notification पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

 

फुल शेती अनुदान योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. Ful Sheti Anudan Arj Namuna

फुल शेती अनुदान योजना अर्ज कुठे करावा Where to apply for flower farm subsidy scheme: –

फुल शेती अनुदान योजना अंतर्गत अर्ज करायचा असल्यास अर्जदारांनी त्यांच्या ग्राम पंचायत मध्ये अर्ज करावा. त्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभे मार्फत केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याचा हा अर्ज कृषी विभागास सादर केला जातो.

फुल शेती अनुदान योजना लागवडीसाठी साठी कलमे, रोपे कोठून खरेदी करावीत:-

या योजने अंतर्गत लाभार्थी निवड झाल्यानंतर फुल शेती करण्यासाठी खालील ठिकाणांहून रोपे खरेदी करावीत.

1. कृषी विभागाच्या रोपवाटीका
2. सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभागाच्या रोपवाटिका
3. खाजगी शासन मान्य रोपवाटिका
4. कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका

हे नक्की वाचा:- अटल पेंशन योजना माहिती मराठी

या योजने अंतर्गत रोपे खरेदी करणे व रोपांची वाहतूक करणे यांची व्यवस्था लाभार्थ्यांनी स्वतः करायची आहे.

फुल शेती लागवड कालावधी काय आहे?:-

फुल शेती लागवड कालावधी हा 1 जुन ते 30 नोव्हेंबर हा आहे.

फुल शेती अनुदान योजना अनुदान Ful sheti Anudan:-

 

फुल शेती लागवड अनुदान योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फुलपिकांच्या लागवडी करिता 2 लाख रुपये इतके अनुदान हे देण्यात येत असते. या अनुदान मध्ये मजुरी तसेच सामग्री याचा समावेश आहे. हे अनुदान आपल्याला एका वर्षात संपूर्ण अनुदान प्राप्त होते.

हे नक्की वाचा:- शेळी समूह योजना माहिती मराठी

लाभार्थी शेतकऱ्यास फुल पिकांचे सर्व साहित्य तसेच कलम, फुल पीक कलम आणताना वाहतूक खर्च स्वतः करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांनी पावत्या सादर केल्या नंतर अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक अकाऊंट मध्ये जमा होते.

Leave a Comment