इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट कसे काम करते? Information of Internet in marathi? How does the internet work?

 

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेटचा शोध कोणी लावला? इंटरनेटचे फायदे आणि तोटे, इंटरनेट कसे काम करते, आपल्या भारत देशात इंटरनेट ची सुरुवात कधी झाली? तसेच इंटरनेट चे प्रकार या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजच्या आधुनिक काळात इंटरनेट हे एक महत्त्वपूर्ण असे साधन आहे. आजच्या काळातील प्रत्येक काम हे इंटरनेट शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दैनंदिन अनेक कार्यांमध्ये इंटरनेट हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सर्व क्षेत्रामध्ये इंटरनेट हे महत्वपूर्ण आहे. बँकिंग सेक्टर असेल, कमुनिकेशन सेक्टर टेक्नॉलॉजी, आय टी  अशा सर्व क्षेत्रांमध्ये इंटरनेट महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळे इंटरनेट विषयी संपूर्ण माहिती साठी ही पोस्ट संपूर्ण वाचा.

 

इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट कसे काम करते? Information of Internet in marathi? How does the internet work?
इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट कसे काम करते? Information of Internet in marathi? How does the internet work?

 

 

आजच्या काळात इंटरनेट हे महत्त्वपूर्ण आहे कारण की आपण इंटरनेट शिवाय थोडा वेळ सुद्धा राहू शकत नाही. तुम्ही एखाद्या वेळेस बँकेत गेला असाल आणि तिथे तुम्ही बँकेची लिंक नसल्याची बोर्ड पाहिलेली असेल तेव्हा या इंटरनेट नसल्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद असतात. यावरूनच आपण समजू शकतो की, दैनंदिन जीवनात इंटरनेट किती महत्वाचे आहे.

 

हे नक्की वाचा:- ई बँकिंग म्हणजे काय? ई बँकिंग चा वापर कसा करायचा?

 

इंटरनेट हे नेटवर्क चे असंख्य असे जाळे आहेत, ज्याच्या द्वारे संपूर्ण जगाला या जाळ्यांच्या द्वारे जोडलेले आहेत. हे जाळे डेटाची आदान प्रदान करते. माहितीची देवाणघेवाण करण्याची इंटरनेट ही आधुनिक टेक्निक आहे. यामध्ये लाखो नेटवर्क चे जाळे आहेत, जे लाखो कम्प्युटर ला जोडले गेले आहेत. इंटरनेट म्हणजे नेटवर्क चे जाळे आहेत.

 

 

 

इंटरनेट कोणाच्या मालकीचे आहे? Who owns the Internet?  :-

 

Internet कोणाच्याही मालकीचे नसते. यावर कोणत्याही देशाचा किंवा कोणत्याही देशाचा सरकारचा किंवा कोणत्याही सरकारी किंवा प्रायव्हेट कंपनी ची मालकी नसते. या इंटरनेटच्या प्रोसेस मध्ये अनेक सारे सर्वर जोडलेले असतात. हे सरोवर वेगवेगळ्या कंपन्यांचे तसेच प्रायव्हेट शाखेने टाकलेले असतात. त्यामुळे असा इंटरनेटचा कोणताही स्पेसिफिक मालक नसतो.

 

हे नक्की वाचा:- Google Pay अकाऊंट काय आहे? ते कसे ओपन करावे?

 

इंटरनेटचा शोध कोणी लावला? Who invented the Internet in marathi?

 

इंटरनेटचा शोध हा कोणत्याही एका व्यक्तीने लावलेला नाही. जेव्हा इंटरनेट अस्तित्वात नव्हते तेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी अनेक संकल्पना मांडल्या गेल्या. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी अनेक तंत्रज्ञान विकसित केली आणि अनेक शोध लावली. दिवसेंदिवस यामध्ये सुधारणा होत गेल्या आणि आता आपण खूप चांगल्या पद्धतीने हाय स्पीड इंटरनेट वापरत आहोत.

 

अमेरिकी सैनिकांना युद्धाच्या काळात चांगली आणि विश्वसनीय सेवा मिळवून देण्यासाठी त्या वेळेस पहिल्यांदा अमेरिकेमध्ये इंटरनेट सेवा वापरली होती.

 

हे सुद्धा वाचा:- UPI म्हणजे काय आहे? UPI चे फायदे संपूर्ण माहिती

ARPANET नावाचे नेटवर्क हे 1969 मध्ये चार कम्प्युटरला जोडून बनविण्यात आलेले होते. आणि तेव्हापासूनच इंटरनेट ची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर या aparnet मध्ये कम्प्युटरची संख्या वाढत गेली ती संख्या 37 पर्यंत पोहोचली. नंतर हे बंद करण्यात आले आणि नेटवर्क ऑफ नेटवर्क बनवण्यात आले होते. वर्ल्ड वाइड वेब इंटरनेट सुविधा पुरविण्याचे काम करत आहेत . Internet information in Marathi

 

इंटरनेटचे फायदे( Advantages of the Internet in marathi):-

1. ऑनलाईन पैसे पाठवणे तसेच पैसे ऑनलाईन स्वीकारणे

2. इंटरनेट वरून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणे जसे की, लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, टिव्ही बिल

3. ऑनलाइन पद्धतीने माहितीची देवाण-घेवाण करणे. घर बसल्या आपण फोटो व्हिडिओ तसेच डॉक्यूमेंट पाठवू शकतो.

4. ऑफिस ची अनेक कामे ऑनलाइन पद्धतीने क्रि शकतो.       कामे जलद होतात.

5. इंटरनेटच्या सहाय्याने आपण घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करून आपल्याला हवी असलेली वस्तू मागवू शकतो.

6. प्रमोशन करू शकतो. इंटरनेटच्या साह्याने आपण कोणत्या गोष्टीचे प्रमोशन करू शकतो जसे की आपला एखादा व्यवसाय असेल तर इंटरनेटच्या साह्याने आपण आपल्या व्यवसायाचे प्रमोशन करू शकतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायात जास्त ग्राहक जुळल्यास जास्त नफा मिळवता येईल.

7. मनोरंजन करण्यासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर आपल्याला करता येतो. आपण मोबाईलच्या सोयीने घरबसल्या इंटरनेटचा वापर करून युट्युब सारख्या साधनांचा वापर करून कोणतीही माहिती व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

 

 

 

इंटरनेटचे तोटे (Disadvantages of the Internet):-

 

इंटरनेटच्या फायदा प्रमाणे इंटरनेटचे काही तोटे सुद्धा आहेत ते खालील प्रमाणे आहेत.

 

1. जास्त वेळ बिनकामाच्या गोष्टीसाठी इंटरनेटचा वापर केल्यामुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.

2. इंटरनेट वापरण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत असतात.

3. इंटरनेटवर बरेच लोक पोर्ण मूवीज बगणे, फोटो वायरल करणे, अफवा पसरत असतात. अशा गोष्टी टाळायला पाहिजे

4. जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर तुमच्यासोबत ऑनलाइन फ्रॉड होऊ शकतो.

5. हॅकिंग करणे,  चीटिंग करणे यासारख्या गोष्टी इंटरनेटच्या वापराने सहजपणे कोणीही तुमच्या सोबत करू शकतात.

 

हे नक्की वाचा:- ATM विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये

 

इंटरनेट कसे काम करते? How does the internet work in marathi :-

इंटरनेट नेमके कसे कार्य करते? आपण पाठविलेली माहिती कशी स्थलांतरित होते या विषयी तुम्हाला प्रश्न पडलेला असेल.

 

आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा आपला कम्प्युटर एका क्लाईंट प्रमाणे काम करत असतो. जेव्हा आपण आपल्या मोबाईल मध्ये गुगल ओपन करतो तेव्हा गुगल असा सर्व्हर चा वापर करत असतो. समजा आपल्याला एखादा मूव्ही डाऊनलोड करायचा असेल. तेव्हा आपण गुगलवर जाऊन त्या मूवीचे नाव गुगलवर सर्च केल्यास आपल्याला मोबाईल अनेक वेबसाइट दाखवितो. गुगलच्या सर्वांनी इंटरनेटवरील असलेला मूव्ही चा सर्व डेटा आपल्या समोर दाखवलेला आहे. Internet Information in Marathi

 

 

आपण इंटरनेटच्या माध्यमातून पाठवलेले संदेश किंवा माहिती ही सर्व्हर पर्यंत पोहचून ज्या व्यक्तीला पाठवायचे आहे त्या व्यक्तीला पोहोचते. एकाच वेळेस अनेक लोक वेगवेगळी माहिती सर्च करत असल्यामुळे अशा वेळेस आयपी ॲड्रेस चा वापर करण्यात येतो.

 

 

भारतातील इंटरनेटची सुरुवात( When did the Internet start in India in marathi?):-

 

जेव्हा आपल्या भारत देशात इंटरनेट ची सुरुवात झाली तेव्हा आपल्या देशातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी तसेच महत्त्वाच्या गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर करण्यात येत होता. आपल्या भारत देशात ज्या वेळेस नवीन इंटरनेट आले होते त्या वेळेस इंटरनेट चा स्पीड हा खूप कमी होता. त्यावेळेस इंटरनेटचा स्पीड हा 8-10 kbps एवढा होता.

 

भारतात तसे इंटरनेट हे शिक्षण  आणि संशोधन यासाठी  १९८८ पासून कार्य करीत आहे. परंतु आपल्या भारत देशात इंटरनेटची सुरवात ही 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली होती. VSNL(विदेश संचार निगम लि.) यांच्या द्वारे इंटरनेट सुविधा भारत देशात सुरू करण्यात आली होती.

 

परंतु आज इंटरनेट हे गावा- गावात आणि खेड्या खेड्यात पोहचले आहे. आता इंटरनेट चा वापर प्रत्येक क्षेत्रात करण्यात येत आहेत. आजचे युग हे डिजिटल व आधुनिक युग आहे. या काळात सर्वच गोष्टी ऑनलाईन होत आहेत. आता आपण इंटरनेट शिवाय राहू शकत नाही. इंटरनेट आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे. इंटरनेट मुळे कोणतेही कार्य सोपे झालेले आहेत. त्यामुळे इंटरनेट ही एक मानवाला मिळालेला आविष्कार आहे.

 

आशा करतो की, इंटरनेट विषयी आपल्या मराठी भाषेतून दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. अशाच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment