शेळी समूह योजना महाराष्ट्र, नवीन योजना | Goat Cluster scheme 2022

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेळी पालन व्यवसायाला गती देण्यासाठी एक नवीन अशी योजना  आपल्या महाराष्ट्र राज्यात 19 एप्रिल 2022 ला शासन निर्णय काढून मान्यता दिली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन योजना शेळी समूह योजना ही सुरु करण्यात आलेली आहे. मित्रांनो शेळी ही गरीबाची गाय समजली जाते त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेळी पालन योजना ही महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण शेळी समूह योजना 2022 (Goat Cluster scheme 2022 maharashtra)  विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

शेळी समूह योजना महाराष्ट्र, नवीन योजना | Goat Cluster scheme 2022
शेळी समूह योजना महाराष्ट्र, नवीन योजना | Goat Cluster scheme 2022

 

 

आपला महाराष्ट्र राज्यात शेळी पालन शेती पूरक व्यवसाय आहे. शेळीपालन आला आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे नेहमी  एक दोन शेळ्या असतात. देशातील एकूण शेळ्यांच्या संख्या पैकी महाराष्ट्रामध्ये 1.6 कोटी एवढा शेळ्या आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक गरीब अल्पभूधारक आणि  अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजूर यांचा शेळीपालन हा उपजीविका करणारा व्यवसाय आहे.Goat Cluster scheme 2022 maharashtra

 

हे सुद्धा वाचा:- शेवगा लागवड अनुदान योजना महाराष्ट्र

 

आपल्या महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या एकूण शेळ्यापैकी जवळपास 76 टक्के इतक्या शेळ्या या स्थानिक जातीच्या आहेत. ज्या स्थानी जातीतील शेळ्या ह्या दिवसेंदिवस कमी उत्पादकता असलेल्या बनत आहे. आपल्या ग्रामीण भागातील लोकांना शेळीपालना विषयीचे नसलेले ज्ञान, शेळी कोणत्या जातीची वापरावी तसेच शेळ्यांची होत असलेली दिशाहीन पैदास, शेळ्यांना देण्यात येणारे अन्न, तसेच शेळीपालनाच्या आधुनिक पद्धती विषयीचे शेळी पालकांमध्ये असलेले अज्ञान या सर्व कारणांमुळे शेळी पालन व्यवसाय मध्ये शेळी पालकांना त्यांच्या शेळ्या ह्या योग्य दराला विकता येत नाही. त्यामुळे या शेळी पालकांचा शेळी पालन व्यवसाय हा तोट्या मध्ये जातो. जर शेळी पालन हा व्यवसाय नवीन पद्धतीने समूह पने केला तर या व्यवसायातून खूप जास्त प्रमाणात आपल्याला नफा कमावता येतो. sheli samuh yojana

 

हे नक्की वाचा:- गोवर्धन गोवंश योजना अर्ज सुरू

 

त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेळीपालन हा व्यवसाय वाढावा तसेच शेळीपालन करून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता यावा व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता पशुपालकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या वतीने “शेळी समूह योजना” राबविण्यात येत आहे.sheli samuha yojana

 

 

शेळी समूह योजना महाराष्ट्र 2022 उद्देश:-

Goat Cluster scheme 2022 information in Marathi maharashtra अंतर्गत शेळी पालकांना एकत्र करून त्यांचा समूह करून शेळीपालनामध्ये नवीन उद्योजक निर्माण करणे शेळी पालकांच्या उत्पादक कंपनी तयार करणे या माध्यमातून शेळीपालन व्यवसाय करण्याकरिता सर्व सुविधा पुरवणे शेळीपालना करीता नवीन नवीन उपलब्ध असलेले तंत्रज्ञान पुरविणे, शेळीपालना करिता वित्त पुरवणी अशा विविध बाबी “शेळी समूह योजना 2022 महाराष्ट्र” अंतर्गत करण्यात येणार आहे.

 

 

त्याचबरोबर शेळी समूह योजना 2022 अंतर्गत दूध प्रक्रिया उद्योग निर्माण करणे पशुखाद्य कारखाना तयार करणे तसेच अनेक पायाभूत सुविधा निर्माण करून एकाच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे याची सोय करणे. ग्रामीण भागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची उत्पन्न वाढले पाहिजे तसेच लोकांना स्वयं रोजगार प्राप्त झाला पाहिजे हे सर्व उद्दिष्ट समोर ठेवून शेळी समूह योजना 2022 ला मंजुरी देण्यात आलेली आहे.Goat Cluster scheme 2022 information in Marathi

 

 

शेळी समूह योजना ( Goat Cluster scheme 2022 ) अंतर्गत समाविष्ट जिल्हे:-

शेळी समूह योजना महाराष्ट्र अंतर्गत कार्यक्षेत्र हे पोहरा तालुका व जिल्हा अमरावती असणार आहे. तर खालील जिल्ह्यांचा या योजने मध्ये तात्पुरता समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, आकोला, नागपूर, वर्धा, आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 

हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अर्ज सुरू

 

 

शेळी समूह योजना महाराष्ट्र अंतर्गत शेळी समूह योजना राबविण्याकरिता पोहरा याठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या साडेनऊ एकर जमिनीवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पोहरा या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर साडेनऊ एकर जमिनीपैकी दोन एकर जमिनीवर सामाईक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे

 

यामध्ये शेतकरी बांधवांना पशुपालकांना सामूहिक शेळीपालन करण्याकरिता मार्गदर्शन तसेच सामूहिक शेळीपालनाचे प्रोत्साहन हे देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना प्रोत्साहित करण्यात तरी येईल त्याच बरोबर पशु पालकांसाठी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी सुद्धा मदत करण्यात येईल. त्यामध्ये सामूहिक शेळीपालना करता पशुपालकांना योग्य ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात येईल.

 

हे नक्की वाचा:- शेळीपालन शेड बांधकाम योजना महाराष्ट्र

त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाच्या पोहरा येथे असलेल्या जमिनीवर उर्वरित अडीच एकर जमिनीवर शेळीच्या दुधापासून प्रक्रिया उद्योग तयार करणे तसेच दुग्धजन्य पदार्थ तयार करणे याकरिता मार्गदर्शन तसेच मदत करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पोहरा येथे असलेल्या उर्वरित दीड एकर जमीन क्षेत्रामध्ये शेळ्यांसाठी मास प्रक्रिया उद्योग चालू करण्यात येणार आहे.

 

 

या समूह शेळी पालन योजना अंतर्गत पोहरा येथील पशुसंवर्धन विभागाच्या उर्वरित अर्ध्या एकर जमिनीवर उत्पादक कंपन्या करिता तसेच खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना व्यवसाय करण्याकरिता कार्यालय उभारण्यात येणार आहे.Goat Cluster scheme 2022

 

 

या योजनेअंतर्गत शेळी समूह योजना व्यवस्थितपणे राबवण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे प्रधान सचिव समितीचे अध्यक्ष असतील. या योजनेअंतर्गत जवळपास महाराष्ट्र राज्यातील तीस हजार शेतकऱ्यांचे समूह तयार करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण व मदत करून समूह शेळी पालन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या शेळी समूह योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात नवीन उद्योजक तयार होतील तसेच अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल. शेळी संबंधित प्रक्रिया उद्योग तयार होतील त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेळी पालन व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय म्हणून उभारनिस येईल.

 

 

Goat Cluster scheme 2022 maharashtra विषयी ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा.

 

Leave a Comment