Ration Card आधार कार्ड सोबत लिंक असे करा ; ही आहे शेवटची तारीख | Ration Card Link With Aadhaar card

 

Ration card हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड वर देशातील गरीब व गरजू कुटुंबांना मासिक मोफत रास्त भावात धान्य वितरित केले जात असते. त्याच प्रमाणे रेशन कार्ड हे कोणत्याही शासकीय योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे तुमचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या या लेखामध्ये आपण रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची पद्धत पाहणार आहोत, त्याच प्रमाणे Ration Card हे Adhar card सोबत लिंक करण्याची शेवटची तारीख काय आहे याची सुद्धा माहिती पाहणार आहोत.

Ration Card आधार कार्ड सोबत लिंक असे करा ; ही आहे शेवटची तारीख | Ration Card Link With Aadhaar card
Ration Card आधार कार्ड सोबत लिंक असे करा ; ही आहे शेवटची तारीख | Ration Card Link With Aadhaar card

 

रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रक्रिया:-

खालील प्रमाणे तुम्ही तुमचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करू शकतात.

Ration Card हे adhar card सोबत लिंक करण्याची ऑनलाईन पद्धत :-

१) ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in या official वेबसाइटवर जा.

२) इथे ‘Start Now’ या पर्यायावर  क्लिक करा.

३) आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा adress संपूर्ण पने भरावा लागेल.

४) आता तुमच्या समोर Ration Card Benefit हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.

५) तुमच्या समोर नवीन dashbord ओपन झालेला आहे या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक, तुमचा रेशन कार्ड चा क्रमांक तसेच तुमचा e-mail address आणि मोबाईल नंबर इतकी माहिती अचूकपणे भरावी लागेल.

६) आता वरील सर्व माहिती व्यवस्थितरीत्या भरल्यानंतर आता तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक OTP हा आलेला असेल.

७) otp प्राप्त झाल्यानंतर ते प्रविष्ट करा आणि ok करा. आता तुमच्या स्क्रीनवर रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक  करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.

८) आता तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय केल्या जाईल आणि आधार कार्ड तुमच्या रेशन कार्ड सोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आधार कार्ड रेशन कार्ड लिंक केले जाईल.

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड लिस्ट मध्ये असे चेक करा तुमचे नाव

Ration Card ऑफलाईन लिंक करण्यासाठी  पद्धत:-

रेशन कार्ड ऑफलाईन पद्धतीने आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला रेशनकार्ड केंद्रावर जावे लागेल. त्यानंतर रेशन कार्ड केंद्र धारकांना तुमचा आधार कार्ड तसेच रेशन कार्ड आणि रेशन कार्डधारकांना पासपोर्ट साईज चा फोटो रेशन कार्ड केंद्रावर नेऊन जमा करावा लागेल. त्यानंतरची पुढील प्रक्रिया रेशन कार्ड केंद्र चालक करतील.

 

हे नक्की वाचा:- रेशन कार्ड डाऊनलोड करा ऑनलाईन व रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक झाले की नाही ते असे चेक करा

रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची शेवटची तारीख:-

Ration card हे adhar card सोबत लिंक करण्याची तारीख ही केंद्र सरकारने वाढविलेली आहे. देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड (Ration Card) आधारशी लिंक (Aadhaar Card Link) करण्याची अखेरची तारीख वाढवली आहे. रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याची नवीन तारीख 30 जून 2022 पर्यंत आहे.

हे नक्की वाचा:- रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल नवीन नियम लागू

जर तुम्ही अजून पर्यंत रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केले नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्यावे. Department of Food And Public Distribution यांच्यामार्फत अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यामुळे 30 जून च्या आत सर्वांनी आपले रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करावे.

अशीच महत्वपूर्ण माहिती वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या teligram चॅनल ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment