कृषी ड्रोन खरेदी अनुदान अर्ज सुरू ; ड्रोनसाठी 10 लाख रुपये पर्यंत अनुदान | Krushi Drone Subsidy Scheme Maharashtra

Drone द्वारे आधुनिक पद्धतीने शेती केल्यास मनुष्यबळ वाचतो तसेच कमी वेळात जास्त काम करता येते. त्यामुळे आजच्या या पोस्ट मध्ये आपण Drone Subsidy Maharashtra विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत

कृषी ड्रोन खरेदी अनुदान अर्ज सुरू ; ड्रोनसाठी 10 लाख रुपये पर्यंत अनुदान | Krushi Drone Subsidy Scheme Maharashtra
कृषी ड्रोन खरेदी अनुदान अर्ज सुरू ; ड्रोनसाठी 10 लाख रुपये पर्यंत अनुदान | Krushi Drone Subsidy Scheme Maharashtra

 

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी कृषी क्षेत्रातील पदवीधारकांना रुपये पाच लाखांपर्यंत अनुदान हे देण्यास केंद्र सरकारच्या वतीने मान्यता मिळालेली आहे. हे देण्यात येणार असलेले अनुदान हे एफपीओ ड्रोनसाठी आहेत. तसेच या योजने अंतर्गत एफपीओ ड्रोनसाठी साडेसात लाख रुपयांपर्यंत अनुदान हे शेतकरी उत्पादक संस्थांना देण्यात येणार आहेत. Drone Subsidy Maharashtra information in Marathi

हे नक्की वाचा:- ओबीसी कर्ज योजना महाराष्ट्र अर्ज सुरू

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकरी हे शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी हात पंपाचा पाठी वरील पंपा चा वापर करत असतात. परंतु या पद्धतीमध्ये वेळ सुद्धा जास्त लागतो तसेच विषबाधा होण्याची सुद्धा शक्यता असते. या मध्ये जर आधुनिक पद्धतीने शेती केल्यास मनुष्यबळ कमी लागून कमी वेळात सुरक्षितरित्या शेतीतील सर्व कामे पार पाडता येतील.

आधुनिक पद्धतीने शेती मध्ये फवारणी करावी असल्यास ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय हा आपल्याला करता येईल. ड्रोनद्वारे फवारणीचा संशोधन हे तीन वर्षांपासून  चालू होते. यासंबंधी शिफारस सुद्धा आपल्या देशातील केंद्र शासनाकडे केली होती.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र शासनाचा निधी वितरित

आपल्या देशात ग्रामीण भागांमध्ये अनेक कृषी शेतीमध्ये शिक्षण घेणारे कृषी पदवीधर आहे अशा कृषी पदवीधरांना ड्रोन पासून स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व या कृषी पदवीधरां चा कृषी क्षेत्रातील आधुनिक पद्धतीकडे वाटचाल व्हावी यासाठी ड्रोन हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

ड्रोन अनुदान योजना लाभ कुणाला मिळणार:-

या drone anudan yojana च्या अंतर्गत कृषी पदवीधारकांना पाच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच दहावी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला आता चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

हे नक्की वाचा:- शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र

ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया :-(How to apply for Drone anudan yojana maharashtra)

Drone anudan yojana maharashtra अंतर्गत लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करावे लागेल. यासाठी तुम्ही अवजारे विभागाचे उपसंचालक तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे देखील संपर्क करू शकतात. Krushi Drone Subsidy

ड्रोन अनुदान योजना कागदपत्रे(Drone Subsidy Documents) :-

१) अर्जदाराचे आधार कार्ड
२) ड्रोन चे दरपत्रक/कोटेशन
३) बँक पासबुक
४) संस्था नोंदणी सर्टिफिकेट
५) संस्थेच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास मान्यता देण्याचे प्रमाणपत्र
६) ड्रोन संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील

 

🛑ड्रोन अनुदान योजना फॉर्म PDF मध्ये – येथे पहा

Leave a Comment