बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प अर्ज सुरू | smart-mh project maharashtra

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी व ग्रामीण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणजेच कृषी क्षेत्राचा विकास जलद गतीने करण्यासाठी आपले केंद्र तसेच राज्य सरकार नेहमी प्रयत्न करत असते. यासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार अनेक योजना राबवित असते. व त्याचबरोबर अनेक उपाययोजना सुद्धा करीत असते. कृषी व ग्रामीण क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासना द्वारे अनेक उपाय योजना बरोबर या क्षेत्राचा विकास करण्यासाठी खाजगी क्षेत्राचे महत्व असल्यामुळे यांच्या सहभागासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे.

 

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प अर्ज सुरू | smart-mh project maharashtra
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प अर्ज सुरू | smart-mh project maharashtra

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प कृषी व ग्रामीण क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच हा प्रकल्प महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. balasaheb thakare smart project maharashtra

 

ह्या प्रकल्पाला जागतिक बँकेद्वारे वित्तपुरवठा म्हणजे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी तसेच ग्रामीण भागामध्ये स्मार्ट उपाय योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कृषी तसेच ग्रामीण भागांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

 

 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत करण्यात येणाऱ्या उपाय योजना:-

महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणारया स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कृषी तसेच ग्रामीण क्षेत्रांना परिवर्तन घडून आणण्यासाठी खालील उपाय योजना करण्यात येणार आहे.

 

१) आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेती करणाऱ्या कमी शेती असणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना योग्य व चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

२) कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३) कृषी क्षेत्रामध्ये लघु तसेच मध्यम उद्योगांच्या स्थापनेसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

४) शेती क्षेत्रातील जोखमीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करता यावे यासाठी हवामानबदलामुळे होणाऱ्या जोखमी पासून बचाव करण्यासाठी हवामानावर आधारित कृषी उत्पादन व्यवस्थांच्या उभारणीस मदत करण्यात येणार आहे.

 

 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत अर्ज प्रक्रिया:-

 

या प्रकल्पांतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र समुदाय आधारित संस्थानी https://www.smart-mh.org या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

 

जर अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने जमा करावयाचे असतील तर या योजने संबंधित कार्यालयात तुम्हाला अर्ज हा विहित नमुन्यामध्ये सादर करावा लागेल. या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत आहे.

 

 

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असल्यास अर्जाचा नमुना खालील लिंक मध्ये दिलेला आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज नमुना पाहू शकता.

 

अर्ज नमुना पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

 

ऑफलाईन अर्ज जमा करण्याचे ठिकाण:-

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत जर अर्ज हा शेतकरी उत्पादक कंपनी करत असेल तर त्यांनी त्यांचा अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय यांच्या कार्यालयात सादर करावा. किंवा इतर संस्था नी अर्ज हा जिल्हा अभियान व्यवस्थापक एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने सादर करावयाचे आहे.

 

ही माहिती महत्वपूर्ण असल्यास सर्वांना शेअर करा.

 

 

Leave a Comment