जिल्हा परिषद योजना अंतर्गत ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सुरू | ZP Scheme 2022 silai machine subsidy

 

जिल्हा परिषद योजना अंतर्गत अनेक कल्याणकारी योजना ह्या राबविल्या जात असतात. आपल्या जिल्ह्यातील गरीब लोक, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर प्रवर्गातील व्यक्ती तसेच महिला यांच्यासाठी अनेक योजना ह्या जिल्हा परिषद योजना अंतर्गत राबविण्यात येत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण अशाच ग्रामीण महिला व मुलींसाठी असणाऱ्या जिल्हा परिषद योजना अंतर्गत ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सुरू | ZP Scheme 2022 silai machine subsidy विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. Zp silai machine yojna,सिलाई मशीन योजना महाराष्ट्र

जिल्हा परिषद योजना अंतर्गत ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सुरू | ZP Scheme 2022 silai machine subsidy
जिल्हा परिषद योजना अंतर्गत ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सुरू | ZP Scheme 2022 silai machine subsidy

 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला तसेच मुलींसाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. त्यापैकी सध्या जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ४ योजना साठी अर्ज सुरू झालेले आहेत. या योजना विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. सिलाई मशीन योजना महाराष्ट्र

हे नक्की वाचा:- zilha paishd च्या इतर अनेक योजनांसाठी इथे क्लिक करा.

 

Jilha parishad yojana 2022 अंतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या या 4 योजनांमध्ये खालील योजनांचा समावेश आह

१) ग्रामीण भागातील महिला व मुलींना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन पुरविणे

२) MSCIT प्रशिक्षण

३) मुलींना शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण योजना

४) ब्युटी पार्लर प्रशिक्षण देणे,

५) फॅशनन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणे

 

वरील सर्व zp scheme 2022 ह्या महिला तसेच मुलींसाठी आहे.

 

 

जिल्हा परिषद योजना 2022 (zp scheme 2022) :-

१) शिलाई मशिन योजना (Silai machine subsidy Yojna) :-

 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग अंतर्गत शिलाई मशिन वितरण योजना राबविण्यात येत आहे. या मध्ये महिला लाभार्थ्यांना ९०% अनुदानावर शिलाई मशिन वितरण करण्यात येणार आहेत.

 

 

 

हे सुद्धा वाचा:- शेळी पालन शेड बांधकाम योजना सुरू

 

 

शिलाई मशिन योजना पात्रता:-

१) ही जिल्हा परिषद शिलाई मशिन योजना जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत असल्याने लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असावा लागतो.

 

२) लाभार्थी महिला ही दारिद्र्य रेषेखालील असावी किंवा वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा कमी असावे.

 

३) शिलाई मशीनचे प्रशिक्षणचे पूर्ण केलेले असावे तसेच त्या बाबत प्रमाणपत्र असावे लागते.

 

४) लाभार्थी महिला मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र जोडावे लागते.

 

५) या योजने अंतर्गत ९०% अनुदान देण्यात येत असल्याने उर्वरित १० % रक्कम ही लाभार्थ्यास भरावी लागेल.

 

 

 

जिल्हा परिषद शिलाई मशीन योजना 2022 कागदपत्रे (Documents for Silai machine subsidy Yojna 2022) :-

 

१) लाभार्थ्यांचे आधार कार्ड

२) पासपोर्ट फोटो

३) बँक पासबुक

४) शिलाई मशिन प्रशिक्षण प्रमाणपत्र

५) वस्तू खरेदी केल्याचे gst बिल

६) इन्कम सर्टिफिकेट

 

 

जिल्हा परिषद योजना नांदेड अंतर्गत महिला तसेच मुलींसाठी शिलाई मशीन वितरण योजना बरोबरच शिलाई मशिन प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण इत्यादी योजना ह्या ९०% अनुदानावर सुरू आहेत. Nanded jilha parishad yojana

 

 

 

जिल्हा परिषद योजना 2022 अर्ज कसा करायचा (How to apply for jilha parishad yojana 2022) :-

 

वरील जिल्हा परिषद योजनांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. हा अर्ज विहित नमुन्यात व्यवस्थित रित्या भरून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात जमा करायचा आहे. वरील सर्व योजना ह्या जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत असल्याने नांदेड जिल्हा परिषद मध्ये अर्ज करायचा आहे. नांदेड जिल्ह्यातील रहिवासी या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात. वरील सर्व जिल्हा परिषद योजनांसाठी अर्ज हा 15 फेब्रुवारी 2022 पर्यत करावयाचा आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी राबविण्यात येत असलेली ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या जिल्हा परिषद शिलाई मशिन योजना अंतर्गत महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. महिला ह्या आत्मनिर्भर होणार आहे.

 

ही माहिती इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

Leave a Comment