मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर असलेला अधिकार किती ! वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा तसेच मुलाचा वाटा संपूर्ण माहिती

 

मित्रांनो संपत्ती आणि मालमत्ता प्रत्येकाला हवी असते. आपण आणि ठिकाणी पाहिले असेल की भाऊ भावा मध्ये तसेच बहिण भावांमध्ये जमिनीसाठी तसेच संपत्तीसाठी भांडणे होत असतात. संपत्तीच्या वाटणीवरून अनेक वाद विवाद होताना आपण पाहिले असेल. अनेक वेळा सख्खे भाऊ संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठत असतात. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण वडिलांच्या संपत्तीवर असलेला मुलींचा अधिकार किती तसेच वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलीला तसेच मुलाला वाटा किती मिळत असतो या विषयी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.What is the right of daughters on their father’s property! Share of daughter as well as son in father’s property

 

मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर असलेला अधिकार किती ! वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा तसेच मुलाचा वाटा संपूर्ण माहिती
मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर असलेला अधिकार किती ! वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा तसेच मुलाचा वाटा संपूर्ण माहिती

 

आपण बरेच वेळा ऐकले असेल की मुलीला वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलापेक्षा कमी प्रमाणात अधिकार दिलेले आहेत. तसेच मुलीला संपत्ती मध्ये अधिकार नसल्याचे सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल. आणि याबरोबरच तुम्ही वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांना सुद्धा समान अधिकार आहे अशी सुद्धा ऐकले असेल. हा एक वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलीला किती वाटा असतो. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये वाटा असतो या विषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलींच्या अधिकाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये कधी वाटा मिळतो आणि कधी वाटा मिळत नाही याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमधून मिळणार आहेत.

 

हे नक्की वाचा:- जमिनी संबंधित केंद्र शासनाचा मोठा निर्णय

 

आपल्या देशामध्ये मालमत्तेबाबत वाद सोडवण्यासाठी तसेच मालमत्तेच्या विभाजन करण्यासंबंधी प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहे. जसे की हिंदूंसाठी हिंदू कायदा. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांसाठी वेगळे वेगळे कायदे हे आहेत. त्यामुळे मुलींची संपत्तीचा वाटा ठरवताना धर्मानुसार वेगवेगळ्या कायद्यानुसार वाटर ठरत असला तरीसुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकांना लागू असणारा भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 हा देशातील प्रत्येक नागरिकांसाठी लागू होतो.

 

त्यामुळे मालमत्तेच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन करायचे असल्यास आपल्या भारतीय न्यायालयाद्वारे सुद्धा या भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 ची मदत घेऊन काही प्रकरणे सोडविली जातात.What is the right of daughters on their father’s property! Share of daughter as well as son in father’s property

 

 

मुलींना वडिलांच्या संपत्तीचे वाटप करत असताना. जर वडिलांनी स्वतः जमीन किंवा संपत्ती विकत घेतली असेल तर वेगळी पद्धत आहे. जर वडिलांकडे असलेली संपत्ती त्यांच्याकडे पिढ्यानुपिढ्या मिळालेली असेल तर अशा जमिनीचे वाटप करत असताना वाटप करण्या संबंधी अनेक गोष्टी ह्या विचारात घ्याव्या लागतात.

 

हे नक्की वाचा:- आता जमीन नावावर करण्यासाठी लागणार फक्त १०० रुपये

भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने संपत्ती किंवा मालमत्ता स्वतः कमवली असेल म्हणजे स्वतः विकत घेतली असेल तर ती मालमत्ता विकण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या व्यक्तीला भारतीय उत्तराधिकार कायद्यानुसार मिळालेला आहे. त्या व्यक्तीस ती मालमत्ता विकण्यापासून कोणीही अडवू शकणार नाहीत. स्वतःची मुले सुद्धा त्यांच्या वडीलास अशा परिस्थितीस अडवू शकणार नाहीत.

 

परंतु जर ती जमीन पिढ्यानुपिढ्या मिळालेली असेल तर अश्या परिस्थितीत वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलांना रोकण्यासंबंधी काही बाबी आहेत.

 

 

वडिलांच्या मालमत्तेत मुलींचे अधिकार काय?

 

वडिलांची मालमत्ता वाटप करताना जर वडिलांचा मृत्यू झाला असेल आणि त्यांनी कुणाच्याही नावावर मृत्यू पत्र केले नसेल तर अश्या परिस्थितीत मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळतो. परंतु जर वडिलांनी त्यांचा मृत्यू होण्याच्या आधीच परिवारातील एखाद्या सदस्याच्या नावावर जसे की मुलगा किंवा मोठा मुलगा किंवा मग छोटा मुलगा किंवा मुलगी अशा कोणाच्याही नावावर मृत्यूपत्र करून ठेवल्यास त्याच व्यक्तीस वडिलांची संपत्ती मिळत असते.

 

 

वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत मुलींचा हक्क विचारात घेतल्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु जर मुलगी मुस्लिम असेल तर तिच्या बाबतीत मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू होतो. अशा वेळेस तिला त्या कायद्यानुसार हक्क मिळत असतात. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी  यांना दोघांना सुद्धा समान अधिकार हे देण्यात आलेले आहेत.

हे नक्की वाचा:- आजोबांच्या मालमत्तेवर नातवा चा अधिकार किती? 

 

मुलींचा वडिलांच्या संपत्तीत हक्क विचारात घ्यायचा असल्यास खालील उदाहरणाद्वारे तुम्हाला सर्व बाबी समजतील.

समजा एखाद्या व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी असेल आणि तो व्यक्ती मरण पावला असेल आणि त्या व्यक्तीने मरण पावण्याच्या आधी जर कुणाच्याही नावावर संपत्ती करून ठेवलेली नसेल किंवा मृत्यूपत्र करून ठेवलेले नसेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या दोन्ही अपत्यांना म्हणजे मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार हे मिळतात. म्हणजेच या व्यक्तीची मालमत्ता हे मुलगा आणि मुलगी यांना अर्धी अर्धी म्हणजे सारखी मालमत्ता मिळेल.

 

 

जरी सुद्धा त्या व्यक्तीच्या मुलीचे लग्न हे झालेले असेल अशा परिस्थितीत सुद्धा मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार हे मिळत असतात. अशा परिस्थितीत मुलीला समान अधिकार असतात.

 

हे नक्की वाचा:- शासकीय पद्धतीने जमीन मोजणी अर्ज कसा करावा

 

परंतु संपत्तीच्या वाटपा मध्ये मुस्लिमांच्या बाबतीत विचार केल्यास या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वाटप करण्या संबंधी मुस्लिम वैयक्तिक कायदा आहे. आणि संपत्तीच्या वाटपामध्ये असलेल्या या मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार मुलीला मुला पेक्षा कमी अधिकार हे देण्यात आलेले आहेत. परंतु सर्व भारतीय नागरिकांसाठी असलेल्या भारतीय उत्तराधिकार कायद्या मध्ये मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार देण्यात आलेले आहे. त्यामुळे जरी मुलगी मुस्लिम असली तरीसुद्धा न्यायालयाद्वारे भारतीय अधिकार कायद्याचा वापर करून त्या मुलीला समान वाटा हा देण्यात येऊ शकतो.

 

 

जर मालमत्ता ही वडिलोपार्जित असेल तर अशा वेळेस मालमत्तेच्या वाटपामध्ये मुलींचे अधिकार हे कमी होत असतात. मुलींची लग्न दुसऱ्या ठिकाणी होत असते त्यामुळे मुलींची लग्न झाल्यानंतर एक ते दोन पिढ्या नंतर त्या मुलीची हक्क हे जवळपास नाहीसे होत असतात.

परंतु हिंदू उत्तराधिकार कायद्यात बदल केल्यामुळे आता मुलींना सुद्धा मुला इतकेच अधिकार हे देण्यात आलेले आहे.

 

 

 

 

खालील परिस्थितीत मुलींना संपत्ती मध्ये अधिकार मिळत नसतात:-

 

 

१) जर एखाद्या मुलीने हक्क सोड प्रमाणपत्रावर सही केलेली असेल तर अशा परिस्थितीत त्या मुलीने वारसाहक्काचा त्याग केलेला असतो त्यामुळे त्या मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळविण्याचा कोणताही अधिकार नसतो.

 

२) जर एखाद्या व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी किंवा अनेक मुले आणि अनेक मुली असेल आणि अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने एखाद्या मुलाच्या किंवा एखाद्या मुलीच्या नावे मृत्यूपत्र करून ठेवले असल्यास ज्या मुलगा किंवा मुलगी च्या नावे मृत्युपत्र केलेले असेल त्याच मुलीस किंवा मुलास अधिकार असतो.

 

वरील सर्व बाबी मध्ये हे लक्षात घ्यावयाची आहे की वडील तेव्हाच मृत्युपत्र करू शकतात जेव्हा त्यांनी स्वतः ती संपत्ती कमविलेली असेल.

 

अश्या पद्धतीने वडिलांच्या संपत्ती मध्ये असलेला मुलीचा तसेच मुलाचा अधिकार हा आपण या लेखा मध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहेत. मी आशा करतो की तुम्हाला या पोस्ट मधील संपूर्ण माहिती समजली असेल, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. अश्याच महत्वपूर्ण माहिती करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.

 

Leave a Comment