नाबार्ड तर्फे ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटी मंजूर | NABARD’s credit to the agricultural sector

आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) तर्फे येणाऱ्या नवीन आर्थिक वित्तीय वर्षासाठी 1 लाख 43 हजार 19 कोटीची तरतूद ही करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वित्त वर्षासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रासाठी कृषी आराखडा हा तयार करण्यात येणार आहेत. नाबार्ड बँक तर्फे देण्यात येणाऱ्या या वित्त पुरवठा अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये नवीन धोरणे आणण्यात येणार आहे. येणाऱ्या वर्ष भरासाठी हा वित्त पुरवठा करण्यात येणार आहे.

 

नाबार्ड तर्फे ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटी मंजूर | NABARD's credit to the agricultural sector
नाबार्ड तर्फे ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटी मंजूर | NABARD’s credit to the agricultural sector

 

 

 

या नाबार्ड बँक अंतर्गत कृषी क्षेत्रासाठी करण्यात येणाऱ्या वित्त पुरवठा मध्ये योजनांचा समावेश केल्यास आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्या वित्तीय योजने अंतर्गत अधिक लाभ मिळणार आहे. नाबार्ड कृषी अनुदान

 

हे नक्की वाचा:- कृषी कर्ज मित्र योजना काय आहे? 

 

नाबार्ड मार्फत करण्यात येणाऱ्या वित्त पुरवठा अंतर्गत वर्ष 2022-23 साठी वित्तीय वर्षा चा प्रस्ताव हा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार समोर सादर करण्यात येणार आहे. नाबार्ड मार्फत करण्यात येणाऱ्या 1 लाख 43 हजार 19 कोटी रुपये हे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या बाबींसाठी खर्च करण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे आर्थिक वर्ष हे आपल्या राज्यातील महिला शेतकऱ्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे.

 

आपल्या देशातील केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करण्याचे उद्दिष्ट हे ठरविले आहेत. आणि या उद्देशाने वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या तसेच नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना पोहोचविण्यासाठी कार्य प्रणाली तयार करण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नाबार्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकत्रित प्रयत्न करण्याचे सांगितले आहेत.

हे सुद्धा वाचा:- नवीन घरकुल यादी २०२२ आली

आपला महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदाचे वर्ष हे महिला शेतकऱ्यांसाठी समर्पित करण्यात आलेले आहे. हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे. त्याच मुळे राज्यातील महिला शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राज्यात राबविण्यात येणार वेगवेगळ्या योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी 30 टक्के इतका निधी राखीव ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर महिला बचत गटांना पूर्वीपेक्षा जास्त रक्तपुरवठा करण्याचे गरजेचे आहे असे नाबार्ड बँकेतर्फे म्हणण्यात आले आहे.

 

 

Leave a Comment