फळ पिक विमा योजना निधी मंजूर | fal pik vima yojana 2021 nidhi vitarit

 

पंतप्रधान फळ पीक विमा योजना अंतर्गत शेतकरी बांधवांच्या फळ बाग पिकांना संरक्षण प्रदान करण्यासाठी ही फळ पीक विमा योजना राबविण्यात येणार असते. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या फळ पिकांना होणाऱ्या अनेक धोक्यापासून त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल होतो. नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. अश्या वेळेस शेतकरी बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी फळ पीक विमा योजना राबविण्यात येते.

 

फळ पिक विमा योजना निधी मंजूर | fal pik vima yojana 2021 nidhi vitarit
फळ पिक विमा योजना निधी मंजूर | fal pik vima yojana 2021 nidhi vitarit

 

 

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना ही दोन भागात राबविली जाते. मृगबहार फळ पीक विमा व आंबिया बहार फळपीक विमा योजना. ही फळ पीक विमा योजना राज्यात संत्रा , मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या आठ फळ पिकांसाठी राबविण्यात येत आहे.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर

आपल्या महाराष्ट्र राज्यात फळ पीक विमा योजना ही HDFC ERGO, Reliance General Insurance, AIC OF INDiA ह्या कंपन्या मार्फत राबविली जात आहे.

 

 

 

फळ पीक विमा योजना अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना फळ पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनीकडे पीक विमा क्लेम हा करावा लागत असतो. त्यानंतर फळ पीक विमा ची नुकसान भरपाई ची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपनी द्वारे थेट ट्रान्स्फर करण्यात येत असते.

 

त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार ही विमा कंपन्यांना त्यांच्या हिश्‍याची रक्कम ही देत असते. त्यानंतर शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजना ची रक्कम ही अदा करण्यात येत असते.

 

 

हे नक्की वाचा:- घरकुल योजना नवीन यादी २०२२ आली 

वर्ष २०२१ मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. वर्ष 2021 मधील ग्रुप बहार फळ पीक ही संपूर्ण पने खराब झालेली होती. त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या नियमानुसार नुकसान झाल्या नंतर नुकसान भरपाई मिळविण्याकरिता पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा क्लेम हा शेतकरी बांधवांनी केला होता.

 

 

त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी फळ पीक विमा क्लेम केला होता अश्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी म्हणजेच नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी फळ पीक विमा कंपनीला निधी हा वितरित करण्यात येत आहे

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक gr काढण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार पीक विमा कंपनीला आपल्या महाराष्ट्र शासनाचा पीक विमा हप्ता म्हणून रुपये 17.77 कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहेत.

 

 

वर्ष २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, त्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

 

हे नक्की वाचा:- जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू

 

या आधी सुधा फळ पीक विमा योजना साठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३० कोटी रुपये हे फळ पीक विम्याचा पहिला हप्ता म्हणून देण्यात आलेले होते.

 

अश्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना पीक विमा वितरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच फळ पीक विमा मिळणार आहेत.

 

 

Leave a Comment