आजच्या काळात शेतकऱ्यांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे शेती करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणे. आजच्या काळात हवामान हे एकसारखे राहिले नाही. आणि पाऊस सुध्दा अनिश्चित झाला आहे. जर शेतकरी कोरडवाहू शेती करत असेल आणि त्या वर्षी पाऊस कमी झाला तर त्या शेतकऱ्याला वर्षभर हाल अपेष्टा सहन करावी लागते. त्या शेतकऱ्यांची संपूर्ण वर्ष भराचि कमाई ते पीक असते. आणि तेच पीक नश्ट झाले तर शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.birsa munda krushi kranti yojana
त्यामुळे जर शेतकऱ्यांना मुबलक सिंचनाची साधने उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल. आणि याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात असतात. अशीच एक योजना म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. ही BIRSA MUNDA KRUSHI KRANTI YOJANA ही आपल्या राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी या योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.Birsa Munda Krushi Kranti Yojana
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत समाविष्ट योजना:-
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. खालील सर्व योजना ह्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.
हे नक्की वाचा:- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? असा करा अर्ज
इन्वेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहीर चे बांधकाम, ठिबक सिंचन संच, पंप संच, तुषार सिंचन संच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तनिकरण अशा विविध योजना इथे उपलब्ध आहे.birsa munda krushi kranti yojana
सदर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील खालील जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) अंतर्गत अनुदान किती?:-
या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत नवीन विहीर बांधकाम करण्यासाठी (रु.2.50 लाख) इतके अनुदान हे देण्यात येत असते, जुनी विहीर दुरुस्ती करायची असेल तर (50 हजार रुपये) इतके अनुदान हे देण्यात येत असते तसेच इनवेल बोअरींग करण्यासाठी (20 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते), पंप संच खरेदी करण्यासाठी (20 हजार रुपये ) इतके अनुदान हे शासनाच्या वतीने देण्यात येत असते. वीज जोडणी आकार साठी (10 हजार रुपये) इतके अनुदान हे देण्यात येत असते तसेच शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी (1 लाख रुपये) इतके अनुदान हे देण्यात येत असते व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), इतके अनुदान हे या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) अंतर्गत योजने नुसार देण्यात येत असते.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता:-
१) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लभार्थ्याकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
२) तसेच अर्ज करणारा अर्जदार हा अनुसूचित जमाती या प्रवर्गातीलच असावा लागतो.
३) जमिनीचा सातबारा व 8-अ अपलोड करणे बंधनकारक आहे.
४) या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदार व्यक्ती ची वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांच्या आत असावे लागते.
५) इन्कम certificate अपलोड करणे गरजेचे आहे.
६) या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराची जमिनधारणा ही 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच नवीन विहीर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी जमीन धारणा ही किमान 0.40 हेक्टर इतकी असावी लागते.
७) या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत एकवेळ लाभ घेतल्या नंतर पुन्हा त्याच लाभार्थ्यास समोरील 5 वर्ष लाभ घेता येणार नाही.
हे नक्की वाचा:- या योजने अंतर्गत मिळणार दरमहा ३ हजार रुपये(पी एम किसान मानधन योजना)
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आवश्यक कागदपत्रे :-
या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या प्रत्येक योजना साठी काही कागदपत्रे हे वेगवेगळी लागतात. योजना नुसार कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.mahadbt farmer’s scheme
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत नवीन विहीर बांधकाम साठी कागदपत्रे:-
१) कास्ट सर्टिफिकेट
२)सातबारा उतारा व आठ अ उतारा
३)लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
४)इन्कम सर्टिफिकेट
५)या योजने अंतर्गत लाभ घेणारा अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी हा अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र जोडावे
६) तलाठ्याचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र. आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नियमानुसार दुसरी विहीर ज्या ठिकाणी योजना अंतर्गत नवीन विहीर घ्यायची आहे त्या विहीर पासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला.
7) पाणी उपलब्धतेचा दाखला.
8) कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र घेऊन जोडावे. mahadbt farmer’s scheme
9)गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
10) या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत ज्या ठिकाणी नवीन विहीर बांधकाम करावयाचे असेल त्याजागेचा फोटो लाभार्थ्यांच्या फोटो सह.
11)या पूर्वी लाभ न घेतल्याचे आदिवासी विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र
12) गावातील ग्रामसभेचा ठराव हा या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी जोडावा लागतो.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) अंतर्गत अर्ज कसा करायचा? :-
BIRSA MUNDA KRUSHI KRANTI YOJANA बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbt farmer’s portal वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असतो.
? बीरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम maha dbt portal वर तुमची नोंदणी करून घ्या.
? नोंदणी झाल्या नंतर तुमचा user name आणि पासवर्ड क्रिएट केल्या नंतर त्या महा डी बी टी शेतकरी पोर्टल ( maha dbt farmer’s portal) मध्ये लॉगिन व्हा.
?आता इथे लॉगिन केल्या नंतर मुखपृष्ठावर कृषी विभाग असे नाव दिसेल त्या समोर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
? आता इथे तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्या पैकी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या ऑप्शन वर क्लिक करा.बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करा.
?आता इथे तुमचे गाव तालुका इथे दिसेल त्या खाली मुख्य घटक मध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना वर क्लिक करा.
? आता घटक निवडा मध्ये इन्वेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, नवीन विहीर चे बांधकाम, ठिबक सिंचन संच, पंप संच, तुषार सिंचन संच, वीज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तनिकरण अशा विविध योजना इथे उपलब्ध आहे.
? त्या पैकी जी योजना पाहिजे त्या योजने वर क्लिक करा. विहीर साठी अर्ज करायचा असेल तर नवीन विहीर बांधकाम वर क्लिक करा.
? आता जतन करा या पर्यायावर क्लिक करून सर्व बाबी सेव्ह करायच्या आहेत.
? आता पुन्हा मुख्य पृष्ठावर येऊन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून पाहा हा पर्याय तिथे असेल त्या वर क्लिक करा.
? आता आपण जो अर्ज केला होता तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसेल, आता make payment या पर्यायावर क्लिक करून. Payment करावयाचे आहे.
? आता 23.60 रुपये इतके payment केल्या नंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झालेला असेल. तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज द्वारे कळविण्यात आले असेल.
हे नक्की वाचा:- गाई म्हशी, शेळी मेंढी व कुक्कुट पालन योजना अर्ज सुरू
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अर्ज केल्या नंतर समोरची प्रोसेस काय आहे?:-
जर तुम्ही वरील प्रमाणे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अर्ज केला असेल तर तुम्ही सर्वप्रथम मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करून पाहा. इथे तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल त्याचे स्टेटस दिसेल.
सध्या तुमचा अर्ज हा छाननी अंतर्गत अर्ज या मध्ये दाखवत असेल. नंतर ज्यावेळेस mahadbt farmer’s scheme lottery लागते. त्यावेळेस जर तुमची निवड झाली तर तुमचा अर्ज हा मंजूर अर्ज या पर्यायात दिसेल.
जर तुमचे mahadbt farmer’s scheme lottery मध्ये नाव आले, तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागेल. त्या मध्ये वैयक्तिक कागदपत्रे आणि चलन अपलोड करावी. जसे की सात बारा, आठ अ, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे अपलोड करायची आहे.
नंतर पूर्व संमती मिळेल तेव्हा योजनेचे काम सुरू करायचे आहे. त्या नंतर योजनेच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाते.
हे नक्की वाचा:- कुसुम सोलर पंप योजना
अश्या पद्धतीने तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना(BIRSA MUNDA KRUSHI KRANTI YOJANA) साठी अर्ज करून लाभ मिळवू शकतात. हा लेख महत्वपूर्ण वाटला असल्यास सर्व मित्रांना नक्की शेअर करा.