Ticker

6/recent/ticker-posts

डिमॅट अकाउंट काय आहे, कसे ओपन करावे, कागदपत्रे फी सर्व माहिती | what is demat account in marathi, demat account opening process in marathi


 

मित्रांनो आपण पाहत आहोत की दिवसेंदिवस शेअर मार्केट हे प्रसिद्ध होत आहे. आजच्या या आधुनिक डिजिटल युगात प्रत्येक जण सहजतेने शेअर खरेदी व विक्री करू शकतो. तसेच ipo मध्ये सुद्धा investment करू शकतो. आणि यासाठी आवश्यक असते ते म्हणजे demat account . तुम्ही आजपर्यंत डिमॅट अकाउंट हा शब्द ऐकला असेल. आजच्या या लेखा मध्ये आपण डिमॅट अकाउंट काय आहे? डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे? कागदपत्रे कोणती लागतात. Demat account ओपन करण्यासाठी खर्च किती येतो? या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. Demat Account all Information in Marathi 


डिमॅट अकाउंट काय आहे, कसे ओपन करावे, कागदपत्रे फी सर्व माहिती | what is demat account in marathi, demat account opening process in marathi



डिमॅट अकाउंट काय आहे? What is Demat Account in Marathi :-

डिमॅट अकाउंट हे असे खाते आहे, ज्याच्या माध्यमातून शेअर्स ची तसेच ipo तसेच इतर securities ची खरेदी विक्री ही डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून केली जाते. 

हे सुध्दा वाचा:- शेअर मार्केट IPO(Initial Public Offering) काय आहे? Ipo साठी कसे apply करायचे.

डिमॅट अकाउंट ओपन केल्यास आपल्याला खालील गोष्टी डिजिटली करता येतात, जसे की शेअर ची खरेदी विक्री करणे, बॉन्ड्स मध्ये investment करणे, तसेच सरकारी सिक्युरिटीज व mutual funds, या मध्ये आपण डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून invest करू शकतो.


डिमॅट हा “DEMATERIALLISATION” या शब्दाचा short form आहे. शेअर्स चे रूपांतर भौतिक स्वरूपात करते आणि या प्रक्रियेस DEMATERIALLISATION असे म्हटले जाते. 




डिमॅट अकाउंट कसे कार्य करते | How Demat Account Works:- 


सुरुवातीला शेअर खरेदी विक्री करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रे हाताळावी लागत होती. जेव्हा जेव्हा आपण शेअर खरेदी किंवा विक्री करत होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला व्यवहार केल्याची कागदपत्रे ही तयार करून ठेवावी लागत होती. या सर्व कागदपत्र पासून सुटका मिळविण्यासाठी आपल्या भारत सण १९९६ मध्ये NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) ची सुरुवात करण्यात आली. तसेच BSE ( Bombay stock exchange) याची सुद्धा सुरुवात करण्यात आली. 

हे सुध्दा वाचा:- ऑनलाईन व्यवहार करताना चुकीच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे?

आता तुम्हाला या nse किंवा bse मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करावयाचे असल्यास तुमच्याकडे demat account असणे गरजेचे आहे.

हे सुध्दा वाचा:- चुकीच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्यास काय करावे? 

जेव्हा तुम्ही डीमॅट अकाऊंट ओपन करता तेव्हा तुम्ही ज्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट ओपन केले आहे तो ब्रोकर nsdl किंवा cdsl कडे तुमचे शेअर्स हे deposit करत असतात. Demat account हे stock broker हे आपले मध्यस्थी म्हणून काम करत असतात. तुम्ही ज्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट ओपन कराल तो तुमचा मध्यस्थ असतो.


डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर तुम्हाला dp id देण्यात येत असते. Unique client code आणि demat account number किंवा BOID देण्यात येत असतो.



उदाहरणार्थ जर तुम्हाला, “XYZ" कंपनीचे शेअर खरेदी करायचे असल्यास जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा ते शेअर आपली शेअर खरेदी ची ऑर्डर place झाल्या नंतर लगेच आपल्या डिमॅट खात्यात जमा केले जातात. त्यानंतर तुम्हाला शेअर खरेदी केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच confirmation मिळतो.

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची? 

तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर तुम्हाला एक संकेतांक देण्यात येतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही डिमॅट खात्यात एंटर होऊ शकतात. तसेच शेअर खरेदी विक्री करण्यासाठी तुम्हाला एक transaction password सुद्धा तयार करावा लागतो.



डिमॅट अकाउंट कश्या प्रकारे ओपन करावे | How to open demat account in Marathi :-

तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाउंट ओपन करावयाचे असल्यास तुम्ही angel one, upstox pro, Zerodha किंवा grow, five paisa या ब्रोकर कडे तुम्ही तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करू शकतात.


सध्या angel one हे free मध्ये अकाउंट ओपन करून देत आहेत. त्यामुळे आपण angel broking चे अकाउंट ऑनलाईन कसे ओपन करायचे हे पाहणार आहोत. 


Step 1: angel one या वेबसाईट ला ओपन करा. आता इथे एक खाते उघडा किंवा ‘Open An Account’ किंवा creat new account या पर्याय वर क्लिक करा.



Step 2: आता इथे तुम्ही तुमची basic माहिती प्रविष्ट करा. जसे की पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी ही माहिती प्रविष्ट करा.



Step 3: आता पुढील माहिती तुम्हाला भरावी लागेल ज्या मध्ये बँक डिटेल, personal details, तुमचा आधार क्रमांक पॅनकार्ड क्रमांक, त्यानंतर otp टाकून verify करून घ्यावे लागेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा face video record करून अपलोड करावा लागेल.




Step 4: तुम्ही ज्या वेळेस अकाउंट ओपन करत असाल त्यावेळेस जर डिमॅट अकाउंट फ्री असेल तर तुम्हाला पैसे जमा करण्याची गरज पडत नाही. जर अकाउंट ओपनिंग फ्री नसेल तर पैसे पेड करावे लागते.



Step 5: सर्व Documents सादर केल्यानंतर आपले डिमॅट अकाउंट kyc प्रक्रिया पूर्ण होऊन ३-४ दिवसात approve होणार आहे.



सध्या angel one हे फ्री मध्ये demat account ओपन करून देत आहेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करू शकतात.


फ्री डिमॅट अकाउंट लिंक:-


https://tinyurl.com/y5jqtb84


कृपया डिमॅट अकाउंट ओपन करते वेळेस कंपनीच्या term आणि conditions वाचून तसेच चार्जेस पाहूनच अकाउंट ओपन करावे. 

Demat Account ओपन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-


१) पॅन कार्ड / Pan Card

२) आधार कार्ड / Aadhaar Card

३) पासपोर्ट आकाराची फोटो (Passport size Photo)

४) रद्द केलेला चेक (Cancelled Cheque)

५) सेव्हिंग्ज बँक खाते पासबुक (Savings PassBook)





Demat Account उघडण्यासाठी किती पैसे लागतात?:-

Demat account ओपन करण्यासाठी तुम्हाला 400 रुपये ते 500 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. आपण अगदी सहज एवढ्या रुपयात डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो. एकादी कंपनी फ्री मध्ये सुध्दा डिमॅट अकाउंट ओपन करून देते. कधी कधी कंपन्या ऑफर आणून डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देत असतात.



डिमॅट अकाउंट ओपन केल्या नंतर आपल्याला विविध प्रकारचे चार्जेस द्यावे लागते. जसे की amc(account maintenance charges) प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी फी आकारली जाते. शेअर खरेदी विक्री करताना brockrage चार्जेस अश्या प्रकारे अनेक प्रकारच्या चार्जेस असतात. आणि हे चार्जेस कंपनी नुसार बदलत असतात. काही कंपन्या फी मध्ये सुट देत असतात. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या