रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल | Ration Card नवीन तरतुदी

जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि सरकारी योजना मधून रेशन मिळवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत. आता सरकारी रेशन दुकानातून रेशन घेण्यासाठी नियम हे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आजच्या या लेखा मध्ये रेशन संबंधी नवीन नियम काय आहे ? ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

रेशन घेण्याच्या नियमात मोठा बदल | Ration Card नवीन तरतुदी

 

 

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग रेशन कार्डच्या नियमात बदल करणार आहे. Department of Food & Public Distribution हे आता रेशन साठी नवीन माणके बनविणार आहेत.

हे नक्की वाचा:- pm awas yojna अंतर्गत घरकुल न मिळाल्यास अशी करा तक्रार

 

या योजने अंतर्गत डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड (ONORC) योजना’ लागू करण्यात आली आहे.

 

शिधाप्रिका/ रेशन कार्ड नवीन नियम कोणते?

सार्वजनिक वितरण विभाग जे लोक सरकारी रेशन दुकानातून रेशन घेतात अशा रेशन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांसाठी जे यापूर्वी माणके तयार करण्यात आलेली होती त्या आधीच्या मानकांमध्ये आता बदल करण्यात येणार आहेत.

 

 

Department of Food & Public Distribution अंतर्गत रेशन लाभ घेण्यासाठी नवीन माणके तयार करण्यात आलेली आहे. आणि या साठी या department च्या राज्य सरकारांसोबत बैठका घेऊन माणके बनविण्यात आली आहे.

हे नक्की वाचा:- राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना काय आहे? 

त्यामुळे आता रेशन कार्ड संबंधी हे नवे नियम काय आहेत, हे जाणून घेणं महत्वाचे आहे.

 

रेशन नियमामध्ये बदल करण्याची गरज का पडली?:-

शिधापत्रिका अंतर्गत रेशन योजना ही देशातील सर्व गरीब व गरजू लोकांसाठी राबविण्यात येत असते. परंतु आता सध्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेली लोकंही या योजने अंतर्गत लाभ मिळवत आहेत.

 

 

आपल्या देशातील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या आपल्या भारत देशातील 80 कोटी लोक (NFSA) अंतर्गत रेशन योजना चा लाभ घेत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत देशातील गरीब लोकांना रेशन हे देण्यात येत असते. परंतु आता आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले बरेच लोक या  (NFSA) अंतर्गत रेशन योजना चा लाभ घेत आहेत.

 

आणि याच कारणामुळे जे देशामध्ये खरोखर गरीब लोक आहेत, ज्या लोकांना खरचं या अन्नाची गरज आहे, अश्या लोकांना या रेशन योजना अंतर्गत लाभ घेता येत नाही.

 

 

 

या सर्व गोष्टी लक्षात घेता, देशातील गरीब व गरजू लोकांना रेशन मिळाले पाहिजे या उद्देशाने सार्वजनिक वितरण मंत्रालय हे रेशन मिळवायचा मानक मध्ये बदल करण्यात येणार आहे.आता येणाऱ्या नवीन नियमांमध्ये पारदर्शक पना असणार आहे. ज्यामुळे आता अशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

 

 

 

रेशन कार्ड संबंधी हे नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ जे व्यक्ती पात्र असतील अश्या गरजू लोकांनाच पात्र व्यक्तींनाच या सेवेचा लाभ मिळणार आहेत, जे अपात्र ठरतील अश्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही.

 

हे नक्की वाचा:- बांधकाम कामगार योजना काय आहे? अर्ज कसा करायचा?

 

Leave a Comment