राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती काय आहे? अटी व शर्ती; अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रे | Rajshri Shahu Maharaj Foreign Scholarship

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती काय आहे? (What is Rajshri Shahu Maharaj Foreign Scholarship):-

मित्रांनो आपले केंद्र तसेच राज्य सरकार लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असतात. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती राबवित असते. या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत परदेशी विद्यापीठात म्हणजेच विदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या, तिथल्या विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही देण्यात येत असते. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परदेशी शिक्षणाकरिता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या राजश्री शाहू महाराज विदेश scholarship साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती राबविण्यात येत आहे.

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती काय आहे? अटी व शर्ती; अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रे | Rajshri Shahu Maharaj Foreign Scholarship

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारा लाभ :-

🛑 परदेशात शिक्षण ज्या विद्यापीठात घेत आहेत, त्या विद्यापीठाची शिक्षण फी ची पूर्ण रक्कम तसेच इतर फी जसे आरोग्य विमा आणि व्हिसा शुल्क शिष्यवृत्तीधारकांना मिळेल. तसेच विमान भाडे सुध्दा या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत देण्यात येत असते.

 

🛑या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना तिथे राहण्याचा खर्च येत असतो त्यामुळे तो खर्च पूर्ण करण्यासाठी वार्षिक निर्वाह निधी हा देण्यात येत असतो. जर विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असेल तर १५,४०० us dollar इतके रुपये देण्यात येत असतात. जर विद्यार्थी इंग्लंड मध्ये शिक्षण घेत असेल तर ९९०० पौड इतके रुपये वर्षभरासाठी निर्वाह निधी म्हणून देण्यात येत असतात.

 

🛑 या योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना परदेशात शैक्षणिक कामासाठी जाण्या येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा इकॉनॉमी क्लास विमानाचा प्रवासाचा खर्च सुद्धा देण्यात येत आहे.

 

🛑तसेच या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्चासाठी अमेरिका तसेच इतर देशांसाठी १५०० यु.एस. डॉलर तर इंग्लंड मध्ये उच्च शिक्षण घेत असेल तर १,१०० जी.बी. पॉड इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे. या देण्यात येत असणाऱ्या रकमेमध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

 

हे नक्की वाचा:- बँक, रेल्वे, एसएससी आणि पोलिस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी barti मार्फत मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप सुद्धा

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अर्ज कसा करायचा :-

राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती साठी अर्ज करायचा असल्यास सदर विद्यार्थ्याने महाराष्ट्र शासनाच्या खालील official वेबसाईट वर जाऊन राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती चा अर्ज डाऊनलोड करावयाचा आहे. अर्ज डाऊनलोड केल्या नंतर तो अर्ज व्यवस्थित संपूर्ण माहिती सह भरायचा आहे. त्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज swfs.applications.2122@gmail.com या ईमेल वर पाठवायचा आहे. त्यानंतर या अर्जाची हार्डकॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३. चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करावयाची आहे. अर्ज हा ईमेल वर आणि वरील पत्यावर दिनांक १४/०६/२०२२ पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पोहचला पाहिजे. राजर्षी शाहू महाराज विदेश शिष्यवृत्ती अर्ज कसा करायचा ?

 

हे नक्की वाचा:- स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक ६०,००० रुपये शिष्यवृत्ती

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे:-

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.

 

१) राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती चा विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज.

२) जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र (cast certificate and cast validity certificate)

३) उत्पन्नाचा दाखला (income certificate)

४) पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे. (सनद / मार्क लिस्ट).

५) परदेश मधील क्यू.एस जागतिक मानांकन ३०० पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विना अट ऑफर लेटर सादर करणे.

६) परदेशातील ज्या विद्यापीठामध्ये अर्जदार विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला आहे त्या संबंधी सविस्तर माहिती पत्रकाची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

७) करारनामे व हमीपत्रे आवश्यक असतील ते.

८)आपल्या भारत देशातील दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र.

९) दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र.

 

हे नक्की वाचा:- अल्पसंख्यांक वसतिगृह योजना

 

तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला आहे. तो अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षभरासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक हे जोडावे लागते; ज्यामध्ये विद्यापीठाचे परीक्षा शुल्क, शिक्षण शुल्क, इतर आवश्यक शुल्क तसेच पाठ्यपुस्तके यांच्यासाठी लागणारा खर्च, तसेच स्टेशनरी साठी लागणारा शुल्क, परदेशात राहणे आणि भोजन चा खर्च तसेच परदेशात शिक्षण घेत असताना जाण्या आणि येण्यासाठी लागणारा शुल्क म्हणजेच विमानाचा प्रवास खर्च या सर्व बाबींचा समावेश अंदाजपत्रकात करावा लागेल.

 

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अटी व शर्ती:-

१)राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती साठी अर्ज करणारा विद्यार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थी च असावा लागतो तसेच अर्जदार हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

२)या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु. ६ लाखापेक्षा जास्त नसावे. जर विद्यार्थ्याला जागतिक क्रमवारीतील पहिल्या १०० विद्यापीठामध्ये व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश हा मिळालेला असेल तर अश्या विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्न हे रु. ६ लाखापेक्षा जास्त नसण्याची अट लागू होत नाही. म्हणजेच वरील विद्यापीठात प्रवेश घेतलेला असेल तर उत्पन्न मर्यादा लागू नाही. जर कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न जास्त असेल तरी चालेल.

३)या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल.

४)या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अंतर्गत एमबीए करायचे असल्यास दोन वर्षे कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम करण्यास परवानगी राहणार आहे.

५) या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अंतर्गत जर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर अश्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ( ICMR) ची मान्यता असणे आवश्यक आहे.

६) राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ज्या विद्यापीठात प्रवेश घेणार असाल त्या विद्यापीठाची क्रमवारी ही जागतीक क्रमवारी ( World University Rank) ३०० च्या आत असावी लागते. म्हणजेच तुमचे प्रवेशित विद्यापीठ हे जागतिक क्रमवारीत ३०० रँक च्या आत rank असणारे असावे लागते.

७) यापूर्वी जर राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर असे विद्यार्थी देखील पुन्हा याच योजने अंतर्गत पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास देखील पात्र असणार आहेत.

हे नक्की वाचा:- समाज कल्याण हॉस्टेल योजना काय आहे? अर्ज कसा करायचा?

 

 

 

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती संपर्क करावयाचे असल्यास:-

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती संपर्क करावयाचे असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा.

 

पत्ता: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन

समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, पुणे-४११००१

अधिक माहिती साठी ई-मेल-fs.directorsw@gmail.com

दूरध्वनी क्र. ०२०-२६१२७५६९/२६१३७९८६

 

 

अश्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करू इच्छित असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती च्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळवू शकतो.Rajshri Shahu Maharaj Foreign Scholarship

 

जर तुम्हाला हा लेख महत्वपूर्ण वाटला असल्यास तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा…

 

 

 

Leave a Comment