Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही अशी करा तक्रार | PM Awas Yojana complaint

 


प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आपल्या भारत देशातील गरीब कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येत असते. ही प्रधानमंत्री आवास योजना केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. ही PM Awas Scheme केंद्र सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेली होती.


PM Awas Scheme | you did not get home in pm awas scheme complain here like this way प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मिळाले नाही अशी करा तक्रार | PM Awas Yojana complaint


या योजने अंतर्गत देशातील बेघर, गरीब लोकांना पक्की घरे बांधून देण्यासाठी अनुदान देण्यात येत असते. Central Government च्या या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करता येतो. जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला या PM Awas Scheme अंतर्गत घरकुल मिळालं नसेल किंवा या योजने संदर्भात इतर काही अडचण असेल तर तुम्ही तक्रार कशी करायची? या विषयी संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत.


हे नक्की वाचा:- प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या साठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

 झोपडपट्टी मध्ये राहणारी कुटुंबे तसेच इतर गरीब कुटुंबांना ज्यांना पक्की घरे नाहीत अशा सर्वांना वर्ष २०२२ पर्यंत पक्की घरे बांधून देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच या pm awas Yojana अंतर्गत केंद्र सरकार लोकांना कर्ज आणि सबसिडीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देते.

 
पीएम आवास योजना ऑफलाईन तक्रार कशी करायची?:-

पी एम आवास योजना संबंधी तक्रार करायची पद्धत अत्यंत सोपी आहे. तुम्ही हे काम सहज करू शकतात. या पी एम आवास योजना अंतर्गत तक्रार करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायत, गट, जिल्हा आणि राज्य स्तरावर तक्रार करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजने अंतर्गत तक्रार तुम्ही थेट pm awas yojna ऑफिस मध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकतात. प्रधानमंत्री आवास योजना तक्रार करण्यासाठी तुम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने तक्रार करू शकतात. आणि तुम्ही तक्रार केल्या नंतर तुमच्या तक्रारीचे निवारण ४५ दिवसाच्या आत करण्यात येते.


हे सुध्दा वाचा:- शेळी पालन शेड बांधकाम अनुदान योजना अर्ज सुरू

Pm awas yojna ऑनलाईन तक्रार कशी करायची? :-

या योजने अंतर्गत तुम्हाला लाभ मिळाला नसल्यास तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. Pm awas yojna ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्ही त्यांचे मोबाईल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून तक्रार नोंदवू शकतात. तसेच हे मोबाईल ऍप्लिकेशन तक्रारी बरोबरच इतर सुविधा सुद्धा पुरविते. हे अँप pm awas yojna या नावाने गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही pm awas Yojana च्या official वेबसाईट वर जाऊन देखील ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात. वेबसाइटवरून तक्रार नोंदविण्यास मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही.आता ऑनलाईन तक्रार करायची असल्यास त्या अँप मध्ये  तुम्हाला सर्व प्रथम लॉगिन आयडी बनवावा लागेल. लॉगिन आयडी, मोबाईल क्रमांक टाकून घ्यावा आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी(one time password) येणार आहे,  तो  otp टाकून तुम्ही लॉगिन करून या पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात. त्यानंतर ४५ दिवसाच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण करण्यात येते.प्रधानमंत्री आवास योजना संपर्क कसा साधावा:-

या प्रधानमंत्री आवास योजना संबंधी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही  1800-11-3377 किंवा 1800-11-3388 तसेच 1800-11-6163 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून माहिती मिळवू शकतात.


अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर न मिळाल्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात.

हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? या योजने अंतर्गत अर्ज कसा करायचा?टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या