कापूस भाव तेजीत, कापसाला मिळाला सर्वाधिक 9900 रुपये भाव

 

गेल्या 15 दिवसापूर्वी कापसाचे बाजार भाव हे कमी झाले होते आणि स्थिर होते, वाढत नव्हते परंतु थोडेफार कमी होत होते. त्यावेस कापसाचे बाजार भाव आणखीन कमी होईल असे वाटत होते, परंतु आता गेल्या 8 दिवसांपासून कापसाचे बाजार भाव हे वाढत आहे. कापसाला सर्वाधिक बाजार भाव हा 9900 रुपये इतका मिळाला आहे. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये जो कापूस भाव वाढेल या अपेक्षेने साठवून ठेवला होता, आता ते शेतकरी त्यांचा कापूस बाजार समिती मध्ये विकण्याकरिता आणत आहेत. त्यामुळे आता बाजार समिती मध्ये कापसाची आवक सुद्धा वाढली आहे. आणि सर्वच कापूस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. Cotton bajar bhav, cotton market price today, bajar bhav, kapus bajar bhav, kapus bhav maharashtra

कापूस भाव तेजीत, कापसाला मिळाला सर्वाधिक 9900 रुपये भावCotton bajar bhav, cotton market price today, bajar bhav, kapus bajar bhav, kapus bhav maharashtra

 

 

हे सुध्दा वाचा:- अतिवृष्टी मुळे शेतमालाचे नुकसान झाल्यास तक्रार निवारण असे करा

आणि आता हे भाव आणखीन वाढून १२ ते १३ हजार रुपये इतके होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. तसेच स्थानिक व्यापारी यांनी सुद्धा येत्या काळात कापसाचे भाव वाढतील असे मत व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजार भावात सतत तेजी येत आहे. बरेच शेतकरी कापसाचे बाजार भाव वाढतील या अपेक्षेत होते व त्यांनी त्यांच्या कापसाची विक्री थांबविली होती. परंतु आता भाव दररोज वाढत असल्याने शेतकरी आता त्यांचा कापूस टप्पा टप्याणे विकत आहे. मागील 8 दिवसात कापसाचे बाजार भाव हे १५०० रुपयांनी तर मागील 4 दिवसात कापूस बाजार भाव हे 800 रुपयांनी वाढ झाली आहे.

 

 

येत्या काळामध्ये कापसाचे भाव हे तेजीत राहतील असे जरी वाटत असले तरी सुद्धा कधी कधी अचानक भाव कमी होत असल्याने शेतकरी कापूस विकावा की थांबावे या विचारात आहे.

 

 

कापसाचे बाजार भाव किती असायला हवे:-

या वर्षी महाराष्ट्रात कापसाची लागवड झाल्या नंतर खूप जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. तसेच कापूस या पिकाला इतर पिकाच्या तुलनेत जास्त लागत खर्च येतो, त्यामुळे कापसाचे बाजार भाव हे १०,००० रुपये प्रति क्विंटल दर जर शेतकरी बांधवांना मिळाला तरच तो शेतकऱ्यांना परवडेल. त्यामुळे कापसाला कमीत कमी १० ते ११ हजार रुपये इतका दर मिळायला हवा.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर अशी करा डाऊनलोड

कापूस या पिकांबरोबर सोयाबीन चे सुद्धा भाव आपल्याला आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वी स्थिर असलेले सोयाबीन चे बाजार भाव आता वाढताना दिसत आहे.

 

Leave a Comment