पोक्रा योजना लाभार्थी यादी जाहीर; अशी करा सर्व गावांची यादी डाऊनलोड | Pocra Yojana Benificery List

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना( nanaji deshmukh krushi sanjivani yojana) म्हणजेच पोक्रा योजना या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज केले होते. अशा सर्व शेतकरी बांधवांनी लाभार्थी यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना आता लाभ मिळवून देण्यासाठी पूर्व संमती देण्यात येत आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना आता पुढील प्रक्रिया पूर्ण करून लाभ घ्यायचा आहे.

पोक्रा योजना लाभार्थी यादी जाहीर; अशी करा सर्व गावांची यादी डाऊनलोड | Pocra Yojana Benificery List

 

पोक्रा योजना(नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना) काय आहे( what is pocra yojana):-

पोक्रा योजना ही शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण अशी योजना आहे. या पोक्रा योजणा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येतो. या पोक्रा योजनेमध्ये १५ जिल्हे आणि या जिल्ह्यातील ५१४२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुमचे गाव या योजने मध्ये असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या योजना साठी अर्ज करू शकता. अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची छाननी करण्यात येते त्या नंतर स्थळ पाहणी करण्यात येते, त्या नंतर तुम्हाला तुम्ही पात्र असाल तर पूर्व संमती देण्यात येत असते. पूर्व संमती मिळाल्या नंतर तुम्हाला योजनेचे काम चालू करून तुम्ही ज्या योजना साठी अर्ज केला असेल त्याचे काम पूर्व करावे लागते. त्या नंतर पाहणी केल्या नंतर तुम्हाला payment मागणी करावी लागते त्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे अनुदान जमा करण्यात येते.

 

महत्वाचं अपडेट: नवीन विहीर अनुदान योजना 2023 करिता अर्ज सुरू

पोक्रा योजने अंतर्गत कोणत्या योजनाचा लाभ मिळू शकतो:-

पोक्रा या योजने मध्ये अनेक प्रकारच्या योजना चां लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो या मध्ये नवीन विहीर योजना ही एक महत्व पूर्ण योजना आहे, जर तुम्हाला पोक्रा योजना अंतर्गत विहीर योजना साठी लाभ मिळाला तर या विहीर योजना साठी १००% अनुदान आहे. तुम्हाला २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान पोक्रा मार्फत मिळते. Pocra yojana मध्ये अनेक प्रकारच्या योजना आहे जसे की की, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, pvc pipe, शेडनेट, मोटार पंप संच, नवीन विहीर, जुनी विहीर बांधकाम, पॉली हाऊस, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन,शेत तळे, नाडेप कंपोस्टिंग, फळ बाग लागवड योजना अशा अनेक प्रकारच्या योजना या pocra yojana अंतर्गत राबविण्यात येत असतात. आणि या प्रत्येक योजना साठी वेगवेगळे अनुदान हे देण्यात येते. कोणत्या योजनेला ४० % अनुदान तर कोणत्या योजनेला ६०% ते १००% पर्यंत सुद्धा अनुदान हे देण्यात येत आहे.

 

पोक्रा योजना साठी अर्ज कसा करायचा(How to apply for pocra yojana) :-

पोक्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोक्रा योजना च्या official वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल. Pocra yojana अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येतो. तुम्हाला खालील वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

Pocra website

 

वरील वेबसाईट वर गेल्या नंतर सर्व प्रथम नोंदणी करून घ्या. Pocra yojana registration केल्या नंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल १००% भरावी लागते. त्या नंतर पिकांचा तपशील तुम्हाला द्यावा लागेल. पिकांचा तपशील भरल्या नंतर अर्ज करा या पर्याय वर क्लिक करून तुम्हाला ज्या योजना साठी अर्ज करायचा असेल त्या योजनेवर क्लिक करून तुम्हीं अर्ज करू शकता.

 

पोक्रा(Pocra) योजना लाभार्थी यादी कशी पहायची (How to check Pocra scheme beneficiary list):-

ज्या शेतकऱ्यांनी पोखरा योजनेत अर्ज केले होते अशा गावांची यादी व त्या गावामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी( benificery list) पाहण्यासाठी

 

पोखरा योजना लाभार्थी यादी येथे डाऊनलोड करा 

सर्वात सर्वप्रथम तुम्हाला Dbt.mahapocra.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल. आता ही webite ओपन केल्या नंतर लाभार्थी यादी , गावाची यादी असा एक पर्याय दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकता.

 

पोक्रा योजना पूर्व संमती मिळाली की नाही ते कशे पहायचे?

तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना( nanaji deshmukh krushi sanjivani yojana) म्हणजेच पोक्रा योजना(Pocra) साठी अर्ज केल्या नंतर. तुमच्या अर्ज हा 3 स्टेज वरून मंजूर होत असतो. या मध्ये प्रामुख्याने desk 1, desk 2, desk 3 या मधून अर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला पूर्व संमती मिळत असते. एकदा पूर्व संमती मिळाली की लगेच योजनेचे काम चालू करून करावे नंतर तुम्हाला लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येते.

 

हे नक्की वाचा: अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये मिळाले असे चेक करा. लगेच!

तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी Pocra yojana च्या official वेबसाईट जावे लागेल. किंवा play store वरून Dbt-Pocra हे अँप डाऊनलोड करून घ्या. त्या नंतर आधार नंबर आणि ओटीपी टाकून लॉगिन करा. आता तुम्ही अर्ज केलेल्या बाबी मध्ये तुम्हाला तुमचा अर्ज दिसेल त्या वर क्लिक करून तुम्हाला अर्जाची तारीख, घटक, टप्पा या बाबी दिसेल. म्हणजेच तुमच्या pocra yojana च्या अर्जाचे स्टेटस दिसेल. त्याच बरोबर तिथे pending, approved असे दिसेल. तिथे पूर्व संमती पत्र असेल तर तुम्हाला पूर्व संमती मिळाली आहे असे समजावे.

 

Pocra Yojana Labharthi Yadi संदर्भातील ही माहिती इतरांना शेअर करा. अश्याच प्रकारच्या योजना विषयी माहिती करिता या वेबसाईटवर भेट देत राहा.

1 thought on “पोक्रा योजना लाभार्थी यादी जाहीर; अशी करा सर्व गावांची यादी डाऊनलोड | Pocra Yojana Benificery List”

Leave a Comment