मिशन वात्सल्य योजना काय आहे | what is mission vatsalya yojana

मिशन वात्सल्य योजना(mission vatsalya yojana) संपूर्ण माहिती:-

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक नवीन योजना मिशन वात्सल्य योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच एकाध्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जर निधन झाले असेल तर अशा विधवा झालेल्या महिलांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक आधार म्हणून त्यांच्या घरी जाऊन सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी हे विविध शासकीय योजनांचे अर्ज हे भरून घेणार आहे. तसेच या महिलांना तसेच पालक गमावलेल्या बालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ हा घरबसल्या मिळवून देण्यात येणार आहे. एकंदरीतच ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालविण्यात येणार आहे. या योजनेची पद्धतशीरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये समन्वय समित्या ह्या स्थापन केलेल्या आहेत. या योजने अंतर्गत कायदेशीर मालमत्तांमधील हक्क हा मिळवून देण्यात येणार आहे. म्हणजेच या मिशन वात्सल्य योजना च्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सध्या सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. मिशन वात्सल्य योजना काय आहे | what is mission vatsalya yojana

मिशन वात्सल्य योजना काय आहे | what is mission vatsalya yojana
मिशन वात्सल्य योजना काय आहे | what is mission vatsalya yojana

 

 

या मिशन वात्सल्य योजना मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज हे सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी हे भरवून घेणार असून लाभ मिळवून देणार आहेत.

 

मिशन वात्सल्य योजना मध्ये कोणते अधिकारी तसेच कर्मचारी तुमचा अर्ज भरून घेतली:-

या मिशन वात्सल्य योजना या मिशननुसार गावपातळीवर तुमच्या गावचा तलाठी, तुमच्या गावचा जो ग्रामसेवक असेल तो, तुमच्या गावतील जिल्हा परिषद शाळा मधील प्राथमिक शिक्षक, तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका इत्यादी ह्या सहभागी होऊन घरोघरी जाऊन अर्ज भरवून घेणार आहे.

 

तसेच शहरी भागामध्ये तुमच्या क्षेत्रातील असलेल्या वार्ड निहाय च्या पथकामध्ये तुमचे वार्ड अधिकारी,तुम्हाला नेमून देण्यात आलेला तलाठी, नगर परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, बालवाडी म्हणजेच अंगणवाडी सेविका ह्यांच्या मार्फत तुमचे अर्ज भरवून घेणार आहे. ह्या सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी तुमच्या शहरातील किंवा खेडे गावातील एकल, विधवा महिला, अनाथ बालकांच्या कुटुंबियांना प्रत्यक्षात भेट देणार आहेत. त्या नंतर हे अधिकारी त्या लोकांना शासनाच्या विविध राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांना समजावून सांगतील, तसेच ह्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही मिळवा व त्यासाठी लाभ देण्यासाठी लागणारी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे प्राप्त करून घेणार आहे. कागदपत्रे प्राप्त केल्या नंतर अर्ज भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून त्याचा परिपूर्ण प्रस्ताव हा तुमच्या तालुक्यातील तालुकास्तरीय समन्वय समितीकडे पाठविनार आहेत.

 

मिशन वात्सल्य योजना मध्ये खालील योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे:-

या मिशन वात्सल्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन खालील अनेक योजना चा लाभ ज्या योजना मध्ये लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असेल अशा सर्व योजनांचा अर्ज भरून त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

या मध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना, कुटुंब निवृत्तीवेतन योजना, व श्रावण बाळ योजना, अनाथ झालेल्या बालकांना बालसंगोपन योजना, तसेच महत्वाची म्हणजे घरकुल योजना सुद्धा या मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, मुलांसाठी तसेच प्रत्येकासाठी कौशल्य विकास योजना चा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे. या कौशल्य विकास योजना मध्ये सव्यं रोजगार निर्माण होण्यासाठी ही योजना चा लाभ देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच अपंग निवृत्ती वेतन योजना, अंत्योदय योजना व शुभ मंगल सामुहिक योजना, तसेच कृषी विभागाच्या विविध राबविण्यात येणाऱ्या योजना

 

वरील सर्व योजना चा लाभ हा त्या बालक व महिलांना देण्यात येणार आहे. ज्या योजना साठी ह्या महिला तसेच बालक पात्र असेल त्या सर्व योजना.

 

ही मिशन वात्सल्य योजना कश्या प्रकारे राबविण्यात येणार आहे:-

ह्या मिशन वात्सल्य योजना मध्ये महिला व बालकांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांची आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात समन्वय समिती ही नेमण्यात आली आहे. ह्या समन्वय समिती मध्ये समितीचे अध्यक्ष तालुक्याचे तहसीलदार असणार आहेत. या समन्वय समिती मध्ये तुमच्या तालुक्याचे तालुका शिक्षण अधिकारी तसेच, त्यांच्या तालुक्यातील नगर परिषद चे मुख्याधिकारी, तालुक्यातील आरोग्य विभाग चे अधिकारी, पोलीस निरीक्षक, विस्तार अधिकारी समाज कल्याण विभागातील तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती चे, तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी, तसेच तुमच्या तालुक्यातील पशू संवर्धन विभागातील पशू संवर्धन अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी अशा अनेक सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांचा या तालुका समन्वय समिती मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. व तालुक्यातील तहसीलदार हे या समन्वय समिती चे अध्यक्ष असणार आहेत.

 

या मिशन वात्सल्य योजना अंतर्गत बालकांना तसेच महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या अंतर्गत मिळवून देण्यात येणार आहे. व ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतील ती कागदपत्रे सुद्धा काढून देण्यासाठी सहाय्य केले जाणार आहेत.

 

Leave a Comment