पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पाहिजे? तर ई-केवायसी करावीच लागेल | अशी करा pm Kisan e-kyc

 

जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी असाल, तर ही न्यूज तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अंतर्गत वर्षाला ६००० रुपये मिळवत आहेत, अश्या शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी आली आहे, ती म्हणजे PM Kisan Yojana अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास आता ई-केवायसी करावीच लागेल. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली अशाच शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दहावा हप्ता हा देण्यात येणार आहे.

 

E kyc is mandatory for all pm Kisan samman nidhi yojana farmers. Farmers will get tenth installment of PM Kisan Yojana only if they do e-KYC.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पाहिजे? तर ई-केवायसी करावीच लागेल | अशी करा pm Kisan e-kyc,E kyc is mandatory for all pm Kisan samman nidhi yojana farmers. Farmers will get tenth installment of PM Kisan Yojana only if they do e-KYC.
पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पाहिजे? तर ई-केवायसी करावीच लागेल | अशी करा pm Kisan e-kyc

 

 

 

पी एम किसान सन्मान निधी योजना काय आहे(what is pm Kisan samman nidhi yojana) :-

या वर्षी पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या  प्रत्येक शेतकऱ्यास पुढील २००० रुपयाचे हप्ते येण्यासाठी आता kyc करणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुम्हाला पुढील दहावा हप्ता हा मिळू शकणार आहेत. या पी . एम किसान सन्मान निधी योजना मध्ये करण्यात आलेला हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे.

हे नक्की वाचा:- तुमच्या गावांमध्ये कोण कोण पी एम किसान सन्मान निधी योजना चा लाभ घेत आहे? अशे शोधा ऑनलाईन

केंद्र सरकार च्या अंतर्गत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही राबविण्यात येत असते. या योजने अंतर्गत देशातील अनेक शेतकरी बांधवांना वर्षाला ६००० रुपये म्हणजेच २००० रुपयांचा एक हप्ता या प्रमाणे तीन हप्त्यामध्ये ६००० रुपये हे देण्यात येत असतात. आणि आता या योजनेचा दहावा हप्ता येणार आहे. परंतु हा दहावा हप्ता हा ज्यांची केवायसी झालेली आहे. अशाच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे दहावा हप्ता येण्यासाठी pm Kisan kyc करावीच लागेल.

 

केवायसी काय आहे?(what is kyc)

Kyc म्हणजे know your coustomer म्हणजेच ग्राहकाची ओळख असे आपण समजू शकतो. तुम्ही वापरत असलेले खाते किंवा एकाधि योजना किंवा बँक अकाऊंट हे तुमचेच आहे, हे तपासण्यासाठी अशा बँका किंवा इतर संस्था ह्या ग्राहकांकडून kyc करून घेणे अनिवार्य करत असतात. कारण की हे अनिवार्य केल्याने तुमची ओळख पटते त्यामुळे ही kyc करणे आवश्यक असते. Kyc न केल्यास तुमचे खाते बंद पडू शकते.

 

आणि ही kyc करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागतात. तेव्हाच त्या कागद पत्रांची पडताळणी करून तुमची kyc ही पूर्ण होत असते.

Kyc करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात ती खालील प्रमाणे आहे.

ओळखीचा पुरावा लागतो, पासपोर्ट आकाराचा फोटो लागतो, तुम्ही आधार कार्ड, pan card, मतदान कार्ड, पासपोर्ट, या पैकी कोणतेही कागदपत्रे जोडू शकतात.

 

हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार ऑनलाईन कशी करायची?

 

पी एम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी कशी करायची How to do PM Kisan Sanman Nidhi Yojana e-KYC :-

पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आता kyc करणे बंधनकारक असल्याने शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर kyc करून घेतली पाहिजे. Pm Kisan e-kyc करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या csc सेंटर किंवा सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र ला भेट देऊन त्यांच्या मार्फत pm Kisan samman nidhi yojana kyc करून घेऊ शकतात.

 

घरी बसून पी एम किसान सन्मान निधी योजना ई-केवायसी कशी करायची:-

घरी बसून पी एम किसान सन्मान निधी योजना e-kyc करण्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर/लॅपटॉप किंवा अँड्रॉइड मोबाईल फोन असायला पाहिजे. जर तुमच्या कडे असेल तर तुम्ही

तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या माध्यमातून घरबसल्या kyc करण्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी योजना e -kyc करण्यासाठी पी.एम किसानच्या official website ला भेट द्या. लिंक खाली दिलेली आहे.

https://pmkisan.gov.in

आता या ठिकाणी तुम्हाला farmers corner हा एक पर्याय या वेबसाइट वर दिसेल. त्या पर्यायवर क्लिक करा.

farmers corner या पर्याय खाली तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्या पैकी पहिल्या क्रमांकाचा पर्याय e-kyc हा तुम्हाला निवडून त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि समोर दिलेला captcha हा जशास तसा समोरील बॉक्स मध्ये टाकून सर्च करायचे आहे.

आता तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वर एक otp (one time password) आलेला असेल तो या ठिकाणी प्रविष्ट करा.

आता समोर जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजना अर्ज करताना दिलेले सर्व रेकॉर्ड हे बरोबर असतील तर otp प्रविष्ट केल्या नंतर लगेच तुमची pm Kisan samman nidhi yojana e-kyc ही पूर्ण होईल.

 

अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या साहाय्याने तुमची pm Kisan samman nidhi yojana ची e-kyc पूर्ण करू शकतात.

 हे नक्की वाचा:-  पी एम किसान सन्मान निधी योजना दहावा हप्ता तारीख जाहीर

PM किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता हा कधी येईल या विषयी अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. PM Kisan Sanman Yojana अंतर्गत सध्या दहावा हप्ता चालू आहे. हा पी एम किसान सन्मान निधी योजना चां दहावा हप्ता २५ डिसेंबर या तारखे पर्यंत येईल असा अंदाज आहे. E-kyc मुळे हा pm Kisan चा दहावा हप्ता हा यायला थोडा वेळ लागू शकतो.

हे सुध्दा वाचा:- पोक्रा योजना काय आहे? ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Leave a Comment