गारपीट व अवेळी पाऊस शेती पिकाच नुकसान लगेच करा क्लेम | Garpit nuksan bharpai

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन दिवसात गारपीट व पाऊसमुळे बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागात गारपीट झालेली आहे यामुळे तूर, हरबरा, गहू तसेच फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहेत. गारपीट मुळे विदर्भ तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकास नुकसान झालेले आहे.

गारपीट व अवेळी पाऊस शेती पिकाच नुकसान लगेच करा क्लेम | Garpit nuksan bharpai

 

 

Garpit मुळे नुकसान भरपाई झाल्यास तुम्ही पीक विमा काढला असल्यास पीक विमा क्लेम तुम्हाला करावा लागेल, ७२ तासाच्या आत तुम्हाला नुकसान भरपाई चा दावा हा करावा लागेल. Garpit nuksan bharpai ही मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या पीक विमा कंपनीकडे क्लेम करून गारपीट नुकसान भरपाई मिळवू शकतात.

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर लगेच करा डाऊनलोड

जर तुमचे गारपीट मुळे नुकसान झाले असेल तर पीक विमा क्लेम कसा करायचा हे आपण आता माहिती पाहणार आहोत. पीक विमा क्लेम करण्याच्या विविध पद्धती आहे. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीक विमा क्लेम करू शकतात. Crop Insurance App च्या साहाय्याने तुम्ही पीक विमा क्लेम करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या पीक विमा कंपनीस त्यांच्या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून पीक विमा क्लेम करू शकतात. हा पीक विमा कंपनीचा मोबाईल क्रमांक तुम्हाला तुम्ही पीक विमा अर्ज भरलेल्या पीक विमा पावती वर दिलेला असतो. पीक विमा क्लेम करण्याची आणखीन दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही पीक विमा कंपनी च्या कार्यालयात जाऊन पीक विमा क्लेम करू शकतात.

हे नक्की वाचा:- शेळी पालन शेड बांधकाम योजना सुरू

जर तुम्हाला गारपीट मुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई पाहिजे असेल तर पीक विमा क्लेम हा 72 तासाच्या आत करणे गरजेचे आहे. Garpit nuksan bharpai ही मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पीक विमा क्लेम करण्याचे आव्हान केले जात आहे. त्यामुळे जर garpit मुळे nuksan झाले असेल तर लवकरात लवकर पीक विमा क्लेम करून घ्यावा ही विनंती.

Leave a Comment