फळ पीक विमा योजना मंजूर | fal Pik Vima Yojana निधी वितरित

आपल्या महाराष्ट्र राज्यातील फळ बागायतदार शेतकऱ्यांना त्यांच्या फळ बागांना होणाऱ्या हवामान बदल तसेच हवामानाच्या धोक्या मूळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास अशा हवामान आधारित धोक्यापासून फळ पिकांना विम्याचे सुरक्षा कवच हे या प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना अंतर्गत देण्यात येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास शेतकरी खचून जाऊ नये त्यांना विम्याच्या माध्यमातून संरक्षित करण्यासाठी हवामान आधारित फळ पीक विमा ही योजना राबविण्यात येत आहे.

फळ पीक विमा योजना मंजूर | fal Pik Vima Yojana निधी वितरित,Fal pik vima yojana manjur
फळ पीक विमा योजना मंजूर | fal Pik Vima Yojana निधी वितरित

 

 

या प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना अंतर्गत खरीप फळपीक विमा व रब्बी फळ पीक विमा यालाच दुसरे नाव म्हणजे मृगबहार फळ पीक विमा आणि आंबिया बहार फळपीक विमा ह्या दोन प्रकारात ही फळ पीक विमा योजना ही राबविण्यात येत असते. या योजने अंतर्गत महसूल मंडळे ही गृहीत धरण्यात येत असते. या प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना मध्ये फळबाग मध्ये संत्रा , मोसंबी, डाळिंब, चिक्कू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष इत्यादी फळ पिकाचा या फळ पीक विमा योजना मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या योजना मध्ये अनेक कंपन्यांचा संवेश होत असतो, त्या कंपन्या जिल्हा नुसार विभाजित करून देण्यात आलेल्या आहे. Fal pik vima yojana manjur

 

मित्रानो आपल्या महाराष्ट्र राज्यात वर्ष २०२१ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उतिवृष्टी झाली व या मुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील फळ बागांचे तसेच इतरही शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते

 

आणि ह्याच झालेल्या नुकसान भरपाई कंपनी कडून करून घेण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केले होते. तसेच नवीन नियमानुसार नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे क्लेम करणे आवश्यक आहे. आणि त्याच साठी आता विमा कंपनीला शेतकरी बांधवांना पीक विमा ची नुकसान भरपाई देण्यासाठी पैशाची गरज असते त्याचमुळे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने मृगबहार या फळ पिकांसाठी निधी वितरित हा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

 

आणि या प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना साठी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी रक्कम ही ५६ कोटी रुपये हे विमा कंपनीस राज्य शासनाचा असलेला हिस्सा देण्यात येणार आहेत.

तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील फळ बाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य शासनाच्या हिस्साची पहिला टप्पा हा रु.30,06,03,405/- इतकी रक्कम kharip fal pik vima 2021 ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीस निधी हा वितरित करण्यात आला आहे.

आणि आता लवकरच हा निधी म्हणजेच पीक विम्याची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात वितरित करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment