इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना | electric vahan kharedi anudan yojana

आजच्या काळात इंधनाचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच प्रमाणे पेट्रोल तसेच डिझेल च्या गाड्या ह्या ग्राहकांना परवडत नाही आहे. याचा खर्च जास्त येतो. तसेच ह्या पेट्रोल तसेच डिझेल च्या गाड्यामुळे प्रदूषण वाढत आहे. वातावरणातील हवा ही शुद्ध मिळत नाही आहे त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहे. या सर्व बाबी नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या(government of maharashtra) च्या माध्यमातून दिनांक जुलै २०२१ पासून इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ हे लागू करण्यात आलेले आहे.

इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना electric vahan kharedi anudan yojana
इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना | electric vahan kharedi anudan yojana

 

या इलेक्ट्रीक वाहन धोरण च्या अंतर्गत इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यासाठीं अनुदान हे देण्यात येणार आहेत. या मुळे जास्तीत जास्त लोक हे इलेक्ट्रिक गाडी घेण्यास समोर येतील. इलेक्ट्रिक वाहनाचा maintenance खर्च हा तुलनेने इतर वाहनाच्या तुलनेत कमी येतो तसेच पेट्रोल डिझेल टाकायची गरज पडणार नाही तसेच प्रदूषण ही कमी होणार आणि सर्वात महत्वाचे शासनातर्फे electrical vehical kharedi anudan सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहक नक्कीच गाडी खरेदी करताना या सर्व बाबींचा विचार करतील. इलेक्ट्रिक वाहने खरेदीदारांना वाहन मध्ये असलेल्या बॅटरी च्या नुसार अनुदान हे देण्यात येणार आहे. बॅटरी ची क्षमता जास्त असेल तर यावर अनुदान ठरते.

 

इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान साठी महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण हे आहे. महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन करण्या संबंधीचे धोरण- 2018 हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या तरतुदींनुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठीं अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल ( BEV) खरेदी करण्यासाठीं अनुदान हे देण्यात येणार आहेत.

 

इलेक्ट्रीक वाहन खरेदी अनुदान अर्ज कसा करायचा :-

इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. तुम्हीं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी वर अनुदान मिळवू शकतात.

यासाठी di.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा भरायचा आहे.

या इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना साठी काही दिवसा नंतर स्पेशल इलेक्ट्रिक वाहन पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यावर इलेक्ट्रिक वाहन योजना साठी अर्ज हे स्विकारले जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव दिल्या नंतर सबसिडी ही 15 दिवसा मध्ये देण्यात येईल.

 

या इलेक्ट्रिक वाहन खरेदी अनुदान योजना साठी देण्यात येणारे अनुदान हे फक्त इलेक्ट्रिक बॅटरी वाहनांसाठी (electric Battery) च्या वाहनांसाठी बॅटरी इलेक्ट्रिक वेहिकल (BEV) साठी असणार आहे. ह्या इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना मार्फत घेण्यात येणाऱ्या गाड्या ह्या आरटीओकडे(rto) कडे बीईव्ही(बॅटरी इलेक्ट्रिक vehical) (BEV) म्हणून नोंदणीकृत असते. या इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना च्या माध्यमातून देण्यात येणार असलेले अनुदान हे वाहन मध्ये असलेल्या बॅटरी च्या क्षमतेवर अवलंबून असणार आहे. दिली जाणारी सबसिडी ही बॅटरी नुसार देण्यात येणार आहे.

 

इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना सबसिडी कशी मिळते:-

तुम्ही घेत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनात असलेल्या बॅटरी च्या क्षमतेनुसार अनुदान देण्यात येते.

या इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना साठी तुमच्या वाहन वरून म्हणजेच तुमच्या वाहनात असेल्या बॅटरी वरून अनुदान देण्यात येते. जास्त मोठी बॅटरी असेल तर त्या गाडीचा खर्च वाढल्याने सबसिडी सुद्धा जास्त देण्यात येत असते.

या योजने अंतर्गत टू व्हीलर,थ्री व्हीलर, मलवाहक गाड्या तसेच सरकारी बसेस साठी सुद्धा  अनुदान देण्यात येत

• या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच टू व्हीलर वाहनांसाठी देण्यात येणार असलेली सबसिडी ही ई -2 डब्ल्यू टू व्हीलर गाड्या(एल 1 आणि एल 2) साठी सबसिडी 10,000 रुपये इतकी दिली जाणार आहे,

• थ्री व्हीलर गाड्या जसे ऑटो या सारख्या ई -3 डब्ल्यू ऑटो साठी एल 5 एम या वाहनांसाठी १५००० रुपये इतकी सबसिडी मिळणार आहे.

*माल वाहक गाड्या साठी ई -3 डब्ल्यू माल वाहक साठी 30,000 रुपये इतकी सबसिडी ही दिली जाणार आहे.

*कार साठी देण्यात येणार असलेली सबसिडी ही ई -4 डब्ल्यू कार (एम 1) एकूण 1,50,000 रुपये इतकी आहे.

* सरकारी ई-बससेस साठी सुद्धा सबसिडी देण्यात येणार आहे ती सबसिडी वाहनाच्या 10% इतकी असणार आहे. या सरकारी ई-बससेस साठी एकूण 20,00,000 रुपये इतकी सबसिडी दिली जाणार आहे.

 

अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक धोरण आणून ग्राहकांना अनुदान देण्याचे ठरवले आहे. या इलेक्ट्रिक वाहन खरेदी योजना च्या माध्यमातून नक्कीच ग्राहकांना लाभ होणार आहे.

Leave a Comment