राष्ट्रीय वयोश्री योजना’ काय आहे, कागदपत्रे, अटी , पात्रता व अर्ज प्रक्रिया | Rashtriya Vayoshri Yojana

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण राष्ट्रीय वयोश्री योजना’ काय आहे, कागदपत्रे, अटी , पात्रता व अर्ज प्रक्रिया | Rashtriya Vayoshri Yojana या योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रानो राष्ट्रीय वयोश्री योजना ही देशातील ज्येष्ठ व दिव्यांग तसेच गरीब व्यक्तींसाठी एक महत्वपूर्ण अशी योजना आहे. या योजने अंतर्गत दीव्यांग गरजू व्यक्तींना उपयोगी असणारी उपकरणे साधने वाटप करण्यात येते. जसे दिव्यांग व्यक्ती व गरीब गरजू वृद्धांना व्हीलचेअर वाटप तसेच इतर अस्नारिद सहाय्यक अशी उपकरणे मोफत पने दिली पुरविली जात असतात. अशा गरजू व्यक्तींना मदत पोहचवन्याचे काम केंद्र सरकार या योजने अंतर्गत करत असते. त्यामुळेच केंद्र सरकारची ही एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजना’ काय आहे, कागदपत्रे, अटी , पात्रता व अर्ज प्रक्रिया | Rashtriya Vayoshri Yojana 2021
राष्ट्रीय वयोश्री योजना’ काय आहे, कागदपत्रे, अटी , पात्रता व अर्ज प्रक्रिया | Rashtriya Vayoshri Yojana

 

 

राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) लाभ कोण कोण मिळवू शकतो:-

मित्रानो देशातील गरजू , वृद्ध, तसेच दिव्यांग व्यक्तींना मदत पोहचविण्यासाठी ही योजना २०१७ मध्ये सरकारने सुरू केली असून सदर या राष्ट्रीय वयोश्री योजना’ चा उद्देश हा आपल्या भारत देशातील तसेच आपल्या समाजातील गरीब घटकातील वृद्धांना मदत पोहचवत असते, किंवा जे व्यक्ती कोणत्या तरी प्रकाराने शारीरिकदृष्ट्या दीव्यांग किंवा अपंग आहेत. किंवा आहे व्यक्ती जे वृद्ध होत चालले आहे जे व्यक्ती वाढत्या वयाबरोबर चालताना त्यांना त्रास होत असेल, किंवा अशे व्यक्ती ज्यांना ऐकता ना त्रास होतोय कमी ऐकू येते किंवा येत च नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो. अशे गरीब व गरजू व्यक्ती आपल्या आर्थिक दुर्बलतेमुळे म्हणजेच पैश्याच्या कमतर्ते मुळे ते त्यांना जी उपकरणे त्यांची दैनंदिन गरजा किंवा कामे करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करु शकत नाहीत अशे नागरीक या योजनेतून लाभ घेऊन उपकरणे मिळवू शकतात.

 

राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) लाभासाठी पात्रता :-

मित्रांनो सदर राष्ट्रीय वयोश्री योजना चा लाभ घेण्यासाठी शासनातर्फे काही पात्रता ठरवून दिलेल्या आहेत. त्या पात्रता आपण दिलेल्या आहेत.

१)या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.

२) सदर राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana 2021) चा लाभ घेणारे व्यक्ती हे वर्ष वय 60 वर्षांवरील लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकतात, यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना नोंदणी करताना संबंधित आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार असते.

३) या योजनेतून गरीब व गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी दारिद्य्र रेषेखालील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) या योजनेचा नोंदणी करताना लाभार्थ्याकडे बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.

हे नक्की वाचा:- रेशन दुकान परवाना कसा मिळवायचा

 

राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) आवश्यक कागदपत्रं:-

मित्रांनो या  योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक असते.

१)राष्ट्रीय वयोश्री योजना चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhar Card) असणे आवश्यक आहे.

२) मोबाइल नंबर (Mobile Number) असावा

३) पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo) असावे लागते.

४) तुम्ही दारिद्य्र रेषेखालील आहात हे ओळखण्यासठी तुमच्याकडे / एपीएल प्रमाण पत्र (BPL card ) असणे आवश्यक असते.

५) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शारीरिक दृष्ट्या असक्षम असल्याचे प्रमाणपत्र किंवा डॉक्टर चा वैद्यकीय अहवाल असावा.

६) या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती जर अर्जदार वृद्धापकाळ निवृत्तीवेतन जर घेत असेल, तर त्याची प्रत जोडावी लागतात.

७)तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शिधापत्रिका / पासपोर्ट / वाहन चालविण्याचा परवाना किंवा एकादे ओळखपत्र असणे आवश्यक आहे

हे नक्की वाचा:- संजय गांधी निराधार योजना अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, संपूर्ण माहिती

राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) अंतर्गत कोणती कोणती उपकरणे दिली जातात:-

या राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) अनेक प्रकारची कृत्रिम उपकरणे दिली जातील ती दिली जाणारी उपकरणे खालील प्रमाणे.

एल्बो कक्रचेस

ट्राइपॉड्स

क्वैडपोड

कृत्रि मडेंचर्स

वॉकिंग स्टिक

स्पेक्टल्स (चश्मा)

श्रवण यंत्र (आवाज ऐकू येण्यासाठी वापरणारी मशिन )

व्हील चेयर

इत्यादी उपकरणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिली जातात.

 

मित्रांनो या राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) चा लाभ खऱ्या अर्थाने सर्व सामान्य व गरजू व्यक्तींना पोहचण्यासाठी या योजनेंतर्गत सरकारतर्फे शिबिर आयोजित केली जातात व यात डॉक्टर व नर्स या सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करून तपासणीनंतर पात्र व्यक्तीला कृत्रिम उपकरणे दिली जातील.

 

राष्ट्रीय वयोश्री योजना’(Rashtriya Vayoshri Yojana) साठी अर्ज कसा करायचा:-

मित्रानो ही Rashtriya Vayoshri Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी official वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो .

जर तुम्ही अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

 

Website Link

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज

मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व नातेवाईकांना ही माहिती नक्की शेअर करा. व आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

Leave a Comment