महिला सरपंचांच्या नवरा आणि नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात बसायला मनाई,बायको सरपंच आणि नवरा कारभारी चित्र आता बंद अन्यथा कारवाई होणार

महिला सरपंचांच्या नवरा आणि नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात बसायला मनाई,बायको सरपंच आणि नवरा कारभारी चित्र आता बंद अन्यथा कारवाई होणार.

 

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे महिला सरपंचांच्या कारभाऱ्यांच्या हस्तक्षेपाला मनाई करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंचाच्या पतीला ग्रामपंचायतीत मनाई करण्यात आली आहे. सरपंचाचा पती ग्रामपंचायतीत असल्यास त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे याची मोठी बातमी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल कारण सरपंच महिला सरपंचांच्या आडून त्यांचे पती कारभार करत असतात त्यामुळे या कारभाऱ्यांना आता ग्रामपंचायतीत मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीत नो एंट्री करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा:- शासनातर्फे ग्राम पंचायती ला मिळणारा निधी आणि योजना

बायको सरपंच आणि नवरा कारभारी चित्र महाराष्ट्रातल्या अनेक गावात पाहायला मिळतं महिला सरपंचाचे नातेवाईक ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडून बसतात महिला सरपंचांच्या नवऱ्याची आणि नातेवाइकांच्या शिरजोरीला सरकारने चाप लावण्याचा निर्णय घेतलाय. महिला सरपंचांच्या नवरा आणि नातेवाईकांना ग्रामपंचायत कार्यालयात बसायला मनाई करण्यात आली आहे.

 

 

महिला सरपंच जर असेल तर बऱ्याच वेळा शंभर टक्के जर विचार केला तर आपण त्यामधला तर जवळजवळ साठ सत्तर टक्के तर त्यांचे पतीच तिथे असतात, महिलांना प्रतिनिधित्व मिळाले तर त्यांच्या हक्कांवर गदा आणतात सरकारच्या या निर्णयाने महिला सरपंच अधिक निर्णयक्षम होणारे ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड थांबावी म्हणून हवेली पंचायत समितीने आदेश काढले आहेत आणि या घडीला एक वचक बसावा म्हणून हे आदेश दिले आहेत ते गट विकास अधिकारी यांनी प्रारीत केलेले आहेत शासनाच्या आदेशाप्रमाणे हे आदेश काढण्यात आलेले आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये ही लूडबुड थांबेल यामध्ये शंका नाही. या निर्णयामुळे गावातील विकासाला चालना मिळेल कारण महिला सरपंचाच्या पतीचा प्रभाव कमी झाल्यामुळे महिला सरपंच व्यवस्थितपणे काम करू शकेल.

हे नक्की वाचा:- सरपंचाची ऑनलाईन तक्रार कशी करायची

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

 

 

Leave a Comment