zilla parishad yojana 2021 जिल्हा परिषद योजना

 जिल्हा परिषद योजना Zilla Parishad Yojna मित्रांनो जिल्हा परिषदे मार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात. काही योजना ह्या फक्त त्याच जिल्ह्यामधे असू शकतात. तर काही जिल्हा परिषदेच्या योजना ह्या सर्वच जिल्ह्यामधे राबविण्यात येत असतात. काही जिल्हा परिषद ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असते तर काही जिल्हा परिषदेच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असते. या मध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग असतात. त्या विभागांसाठी हे वेगवेगळे अर्ज मागविण्यात येत असतात. मित्रांनो आता हळू हळू महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सुरू होत आहे. आजच्या या लेखामध्ये आपण जिल्हा परिषद योजना औरंगाबाद च्या पाच योजना सुरू झालेल्या आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. (ZP Schemes Maharashtra)


Zp schemes Maharashtra how to apply for Zilla Parishad Yojna. जिल्हा परिषद योजना Zilla Parishad Yojna
jilha parishad yojana 2021 maharashtra


जिल्हा परिषदेच्या अनेक योजना:-(Jilha Parishad Yojana)

मित्रांनो सध्या जिल्हा परिषदेच्या पाच योजना सुरू झालेल्या आहेत. या मध्ये 

१)शेळी पालन गट वाटप योजना
२)गाय म्हैस करिता अनुदान योजना
३)स्प्रिंकलर अनुदान योजना
४)पीव्हीसी पाईप योजना
५)मिरची कांडप यंत्र
 
सध्या ह्या पाच योजना सुरू आहे. आणि वरील योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.(zilla parishad yojana 2021 जिल्हा परिषद योजना)  

अटी व पात्रता:-


अटी व पात्रता मध्ये अर्जदार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असावा. अर्जदाराने या पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदार हा गरजू असावा.अर्जदाराच्या कुटुंबामध्ये कुणीही शासकीय किंवा निमशासकीय संस्था मध्ये नसावा. इत्यादी अटी व पात्रता मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वरील सर्व योजना औरंगाबाद जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांना अर्ज करता येणार आहे. तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद मध्ये सदर योजनेची चौकशी करून अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधा किंवा तुमच्या पंचायत समितीशी संपर्क साधावा. मित्रानो जिल्हा परिषद मार्फत आपल्या जिल्ह्यातील लोकांचे कल्याण करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात योजना कमी जास्त राहू शकतात. जिल्हा परिषद विविध योजना राबवत असते. जसे. शेळी व बोकुड देणे, म्हैस देणे, अनेक अवजारे, यंत्रे, शिलाई मशिन, अश्या प्रकारच्या जिल्हा परिषद च्या अनेक योजना राबवत असतात.
(ZP Schemes Aurangabad)

कागदपत्रे:-


वरील पाचही जिल्हा परिषद योजना चा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे लागतात.

१) अर्जदाराचा सातबारा उतारा (७/१२)
२)जातीचा दाखला
३) उत्पन्नाचा दाखला
४) दारिद्र रेषेखालील असल्यास ग्रामसेवकाचा दाखला
६) यापूर्वी सदर योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
७) कुटुंबातील सदस्य शासकीय/निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र
८) ग्रामसभेतील योजनेचा लाभ देणे बाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत
९) आधार कार्ड
१०) राष्ट्रीयकत बँकेचे खाते पुस्तकाची प्रत
११)लाभदायक गरजू,पात्र असल्याबाबतचा ग्रामसेवकांनी दिलेला दाखला


अर्ज कसा करावा:-

zilla parishad yojana साठी खालील पद्धतीने अर्ज करावा
वरील पाचही जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.सर्वप्रथम तुम्ही वरील सर्व अर्ज डाऊनलोड करा. त्याला सर्व नाहरकत दाखले जसे; शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याचा दाखला, अर्जदार गरजू असल्याचा दाखला, यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला असे सर्व दाखले व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून त्या नंतर ते अर्ज व्यवस्थित रित्या भरून तुमच्या पंचायत समिती मध्ये जमा करा.

अर्ज कुठे मिळेल:-


मित्रांनो वरील जिल्हा परिषद योजना चे पाचही अर्ज आपण तुम्हाला देणार आहोत. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही ते अर्ज डाउनलोड करा.वरील लिंक वरून सर्व अर्ज डाऊनलोड करून घ्या त्यानंतर त्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा सर्व ना हरकत दाखले जोडा अर्ज व्यवस्थित रित्या भरा व तुमच्या पंचायत समिती मध्ये जमा करा.मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद च्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता.2 टिप्पण्या

Have any doubt let me know

टिप्पणी पोस्ट करा

Have any doubt let me know

थोडे नवीन जरा जुने