पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना २०२१ ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार

 

 पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021 ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत रूपये १ लाख ते ३ लाखांचे बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे.कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा असा महत्वाचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार मार्फत घेेेेेतला आहे.(panjabrao Deshmukh vyaj savalat yojana)

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021 ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार,panajabarao Deshmukh vyaj savalat yojana
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

 

 

आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले नाही पाहिजे म्हणून राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या परिसरा मध्ये धान्य चाळण यंत्र बसविण्यात यावे,त्याचप्रमाणे शेतमाल बाजार आवारात पाठविण्यापूर्वी गाव पातळीवर शेतमालाची आर्द्रता तपासण्यासाठी विकास संस्थेच्या स्तरावर मॉइश्चर मीटर उपलब्ध करून द्यावे.

 

त्यासाठी संबंधित विविध योजनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याच्या सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.रूपये १ लाख ते ३ लाख पर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या(panjabrao Deshmukh vyaj savalat yojana)

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021 

राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खाजगी बॅका,प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,पतसंस्थेच्या ज्या सदस्यांनी रु.1 लाख किंवा त्यापेक्षा कमी पीक कर्ज घेतले आहे.असे शेतकरी रुपये 1 लाख पेक्षा जास्त ते रूपये. 3 लाख पर्यंतच्या कर्जाची वेळेत परत फेड करणा-या शेतक-यांना 2% सवलत मिळत असे, परंतु आता या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

 

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत मिळणारी व्याज सवलत:-

 

सुधारित पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना योजनेनुसार रु.1 लाख पर्यंत पीक कर्जाच्या परतफेडीवर आता  3 टक्के व त्यापुढील रूपये 3 लाख रु पर्यंतच्या पीक कर्जाच्या परतफेडीवर सध्या  2 टक्के ऐवजी 1 टक्का व्याज अनुदान देण्यात येणार आहे.

सुधारित योजनेनुसार वर्ष 2018-19 या वित्तीय वर्षापासून वाटप झालेल्या पीक कर्जाच्या वसुलीवर व्याज अनूदान वितरीत करण्यात येईल.असे कळविण्यात आले आहे.(panjabrao Deshmukh vyaj savalat yojana)

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खाजगी बॅकांनी दिलेल्या पीक कर्जाला देखील लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकर्यांना रूपये तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे.

 

शेतकऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली.

त्या पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाणार आहे

मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलं आहे. शेतऱ्यांसाठी ही योजना महत्वपूर्ण भूमिका घेणारी ठरणार आहे.

 

हे सुध्दा वाचा: शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज करा

ठिबक सिंचन योजना लाभार्थी यादी.

Leave a Comment