कृषी यांत्रिकीकरण योजना संपुर्ण माहिती | krushi yantrikikaran yojna

कृषी यांत्रिकीकरण योजना संपुर्ण माहिती नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने प्रकल्पांतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही वर्षातील हवामानातील बदल व पर्जन्यमानातील अनिश्चितता जसे पावसाचे एकूण कमी दिवस, कमी वेळेत जास्त पाऊस, सरासरीपेक्षा कमी पाऊस, पावसाचा तीन आठवड्यांपेक्षा जास्त खंड, मान्सूनचे उशिरा आगमन व वेळेपुर्वी निघून जाणे, गारपीट व अवेळी पाऊस या सर्व हवामानातील बदलामुळे पाणी टंचाई (पिण्यासाठी, जनावरांसाठी, पिकांसाठी), पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेत घट, कृषी उत्पादन वाढीचा दर घटणे, अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांमध्ये नैराश्य, ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर होऊ लागले इ. परिणाम दिसून येत आहेत. या सर्व परिणामामुळे वेळेत पेरणी न होणे, मजुरांची कमतरता, जमिनीची धूप इ. संभाव्य दूरगामी परिणाम दिसून येत आहेत. लागवडी योग्य जमिनीतून किंवा घटलेल्या लागवडीयोग्य जमिनीतून भविष्यात अधिक उत्पादन व अधिक उत्पन्न घेण्यासाठी, तसेच शेतक-्यांना व प्रामुख्याने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी पारंपरिक शेतीपद्धतीतून आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे.

 

कृषी यांत्रिकीकरण योजना संपुर्ण माहिती
कृषी यांत्रिकीकरण योजना संपुर्ण माहिती

बदलत्या हवामानानुसार जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजनासाठी मशागतींची पद्धत, वेळेवर व योग्य मात्रेत खते-बियाणे पेरणी, आंतरमशागत, फवारणी, काढणी मळणी, प्राथमिक प्रक्रिया, साठवण, वाहतूक व विक्री इत्यादी कामे करण्यासाठी अत्याधुनिक कृषि यंत्रांची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. बीबीएफ व इतर यंत्राच्या वापरामुळे पावसातील खंडाच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, अतिपावसाच्या काळात पाण्याचा निचरा करणे, उत्तम मशागत, निविष्ठांचा काटेकोर वापर, वेळेवर काढणी व मळणी, उत्पादन खर्चामध्ये बचत असे काही दृश्य फायदे दिसून आले आहेत. म्हणून शेतीमधील विविध कामासाठी आवश्यक कृषी औजारांची उपलब्धता वाढविणे गरजेचे आहे. बहुतांशी कृषी औजारे चालविण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असल्याने वैयक्तिक लाभार्थी स्तरावर ट्रॅक्टर आणि कृषी औजारे घेणेसाठी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच रुंद वाफा व सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर औजारे सेवा पुरविण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर या घटकासोबत बीबीएफ यंत्र घेणे बंधनकारक करण्यात येत आहे. Krushi yantrikikaran yojna 2022

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022

 

 

प्रकल्प जिल्ह्यातील पीकरचना आणि शेतीपद्धती यांचा विचार करून केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या कृषी यंत्रे/औजारांपैकी हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी कृषी यंत्रे/ औजारे यांची यादी कृषी विद्यापीठ/कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने तयार करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रकल्पातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामुग्री/औजारे खरेदीस प्रोत्साहीत करणे व त्याद्वारे हवामान अनुकूल शेतीस पूरक कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे तसेच वैयक्तिक स्तरावर भाडे तत्वावर औजारे सेवा पुरविणे हे कृषि यांत्रिकीकरण घटकाचे प्रमुख उद्देश आहेत.

 

२.कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश:

 

१. बदलत्या हवामानाशी तोंड देण्यास शेतकऱयांना सक्षम करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

 

२. पीक रचनेनुसार आवश्यक कृषि औजारे घेण्यासाठी प्रकल्प गावातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणे.

 

३. हवामान अनुकूल शेतीपद्धतीमध्ये ट्रॅक्टर आणि इतर कृषी औजारांची भाडे तत्वावर सेवा गाव स्तरावर उपलब्ध करून देणे.

 

४. कृषि यांत्रिकीकरणाच्या द्वारे रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान आणि इतर हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे.

 

३. लाभार्थी निवडीचे निकष:

 

आ) ट्रॅक्टर + बीबीएफ यंत्रासाठी लाभार्थी निवड:

 

१. प्रकल्प गावासाठी प्रस्तुत घटकांतर्गत अर्थसहाय्य देणेसाठी ट्रॅक्टरची कमाल संख्या निर्धारित करण्यात येत असून त्यासाठी गावातील निव्वळ पेरणी क्षेत्र आधारभूत मानण्यात यावे आणि सदर क्षेत्र सन २०११ च्या सर्वसाधारण जनगणनेनुसार घेण्यात यावे. सदर क्षेत्राच्या आधारे प्रती २०० हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्राकरिता १ ट्रॅक्टर याप्रमाणे प्रकल्प गावासाठी ट्रॅक्टर संख्या निर्धारित करण्यात यावी. २००० हेक्टर किंवा अधिक निव्वळ पेरणी क्षेत्र असलेल्या गावांसाठी ट्रॅक्टरची संख्या कमाल १० राहील. ट्रॅक्टरसाठी गावातील लक्षांक निश्चित करताना सर्व गावांमध्ये किमान २ ट्रॅक्टर मिळतील अशी दक्षता घेण्यात यावी. तसेच उपलब्ध वार्षिक निधीच्या अधिन राहून या घटकाची अंमलबजावणी करण्यात यावी. निर्धारित केलेल्या संख्येपैकी ५० % हिस्सा अनु. जाती, अनु, जमाती, विमुक्त व भटक्या जमाती इ. प्रवर्गासाठी एकत्रितपणे राखीव ठेवण्यात यावा. अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त व भटक्या जमाती प्रवागामधून तसेच

इतर प्रवर्गामधून महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांच्या अर्जाना प्राधान्य देण्यात यावे.

 

२. ट्रॅक्टर या घटकासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान १ हेक्टर जमीनधारणा असणे बंधनकारक आहे.

 

३. अर्जदारास ट्रॅक्टरसोबतच बीबीएफ यंत्रासाठी देखील अर्ज करणे बंधनकारक राहील.

 

४. अर्जदाराचे कुटुंबातील (कुटुंब म्हणजे आई-वडील व त्यांच्यावर अवलंबुन असलेली अविवाहीत अपत्य)आई-वडील अथवा त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या अविवाहीत अपत्यांच्या नावे ट्रॅक्टर असल्यास सदर अर्जदार नवीन ट्रॅक्टर या बाबीसाठी पात्र राहणार नाही.

 

५. ट्रॅक्टर खरेदीसाठी एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करण्याची मुभा राहील.

 

६. वरील १ ते ५ मधील निकषानुसार ट्रॅक्टर या घटकासाठी प्राप्त अर्जांची छाननी करताना ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) अनु.जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने अर्जदारांची यादी तयार करावी.

 

७. अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्गाच्या राखीव हिस्स्यासाठी सदर प्रवर्गातून प्राप्त अर्जाना प्राधान्यक्रमाने मंजुरी देण्यात यावी. सदर प्रवर्गातील अर्ज संख्या संबधित गावासाठी निर्धारित केलेल्या संख्येच्या ५० % पेक्षा अधिक असल्यास सोडत प्रक्रिया राबवावी. जर राखीव प्रवर्गासाठी निर्धारित संख्येइतके अर्ज प्राप्त झाले नाही तरी ती संख्या तशीच राखीव ठेवण्यात यावी.

 

८. इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांचे संबधित गावासाठी निर्धारित केलेल्या संख्येच्या ५०% राहील. निर्धारित संख्येपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्जापैकी लाभार्थी निवड करण्यासाठी सोडत प्रक्रिया राबवावी.

 

९. सदर सोडत प्रक्रिया संबधित गाव ज्या कृषी मंडळामध्ये येत आहे त्या मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पारदर्शक पद्धतीने राबवावी. यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य तसेच ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेले शेतकरी यांच्या उपस्थिती मध्ये सोडत काढावी.

 

१०. सदर सोडतीकरिता उपस्थित असलेल्या अर्जदारांना ट्रॅक्टर+बीबीएफ यंत्र या घटकासाठी सोडत प्रक्रियेची सविस्तर माहिती द्यावी.

 

११. वरीलप्रमाणे संबधित प्रकल्प गावातील ट्रॅक्टर+बीबीएफ यंत्र घटकासाठी पात्र अर्जदारांची यादी अंतिम करण्यात यावी.

 

 

आ) ट्रॅक्टरव्यतिरिक्त इतर यंत्र/औजारांसाठी लाभार्थी निवड:-

 

१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.

 

२. सदर घटकासाठी इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकर्यांना त्याच औजारासाठी पुनश्च लाभ देय असणार नाही.

 

३. प्रकल्प कालावधीमध्ये एका शेतकर्यास ट्रॅक्टरचलित यंत्र/औजारांपैकी बीबीएफ यंत्राशिवाय कोणत्याही एका यंत्र/औजारासाठी अर्ज करता येईल.

 

४. ट्रॅक्टरचलित यंत्र/औजारांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सदर यंत्र/ औजार चालविण्यासाठी आवश्यक अश्वशक्तीचा ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे.

 

५. अर्जदाराचे कुटुंबातील आई-वडील अथवा त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या अविवाहीत अपत्यांच्या नावे ट्रॅक्टर असल्यास आणि सदर कुटुंबातील अन्य सदस्याने ट्रॅक्टर चलीत यंत्र/औजारांसाठी अर्ज केला असल्यास असे अर्ज स्वीकारण्यात यावे. तथापि या करीता संबंधीत अर्जदारास कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा (RC पुस्तिका प्रत) सादर करणे बंधनकारक राहील.

 

६. ट्रॅक्टरचलित नसलेल्या कृषी यंत्र/औजार खरेदीसाठी एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करण्याची मुभा राहील.

 

७. कृषी यंत्र/औजारांकरिता लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये प्रकल्पाने निर्धारित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार लाभार्थी निवड करावी.

 

४. अर्थसहाय्य:

 

१. सदर घटकासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व २ हेक्टर पर्यंत जमीनघारणा असणाऱ्या शेतक-यांसाठी आणि २-५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अर्थसहायाचे प्रमाण निर्धारित केले असून. केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सूचना मध्ये नमूद केलेल्या तांत्रिक निकषानुसार यंत्र/औजारे असणे बंधनकारक आहे. अनुदानाची परिगणना राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन २०१९-२० आणि केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. सदर सूचनांमध्ये औजारनिहाय अनुदानाची मर्यादा निर्धारित केलेली आहे  यामध्ये केंद्र/ राज्य शासनाकडून वेळोवेळी होणारे बदल लागू राहतील

 

२. ट्रॅक्टर साठी २ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असणाच्या शेतक-्यांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा रु.१.२५ लाख यापैकी जी कमी असेल ते आणि २-५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ४० टक्के किंवा रु. १.०० लाख यापैकी जी कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. ट्रॅक्टरसोबत बंधनकारक असलेल्या बीबीएफ यंत्रासाठी अर्थसहाय्य देय राहील.

 

३. ट्रॅक्टर्स व पॉवर टीलर्सच्या केंद्र शासनाने मंजूर केलेल्या यादीतील मॉडेल/मेकलाच अनुदान अनुज्ञेय असुन केंद्र शासनाच्या यादीव्यतीरीक्त इतर ट्रॅक्टर्स व पॉवर टीलर्सला अनुदान देय राहणार नाही. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या औजारांची यादी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

लाभार्थी:-

 

१. सदर घटकांतर्गत ट्रॅक्टर तसेच इतर औजारांसाठी (लाभार्थी निवडीचे निकष) मध्ये नमूद निकषानुसार पात्र असणा-या इच्छुक शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रकल्पाच्या

https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा. तसेच खालीलप्रमाणे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

अ) लाभार्थ्याचा ७/१२ व ८-अ चा उतारा.

आ) लाभार्थी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असल्यास वैध अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.

 

२. ट्रॅक्टर या घटकाकरिता सोडत प्रक्रिया घोषित केल्यास सदर सोडतीस उपस्थित राहणे.

 

३. पूर्वसंमती प्राप्त झालेनंतर ४५ दिवसांच्या आत मंजूर केलेल्या कृषी औजाराची खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सदर घटकाच्या अर्जासाठी दिलेली पूर्वसंमती रद्द करण्यात येईल.

 

४. मार्गदर्शक सूचनानुसार दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.

 

५. पूर्व संमतीनुसार आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील तसेच ट्रॅक्टर साठी पूर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी बीबीएफ यंत्राची खरेदी विहित मुदतीत पूर्ण करावी. यंत्र/ट्रॅक्टर खरेदीसाठी आगाऊ (अग्रिम ) रक्कम मिळणार नाही.

 

६. निवडलेल्या लाभार्थीना त्यांच्या पसंतीनुसार तसेच योग्य गुणवत्तेची खात्री करून सेवा पुरवठादार संस्थांकडून यंत्र/औजारे खरेदी करण्याची मुभा आहे.

 

७. ट्रॅक्टर्स व पॉवर टीलर्सच्या केंद्र शासनाने मंजूर केलेल्या यादीतील मॉडेल/मेकलाच अनुदान अनुज्ञेय असुन केंद्र शासनाच्या यादीव्यतीरीक्त इतर ट्रॅक्टर्स व पॉवर टीलर्सला अनुदान देय राहणार नाही.

 

८. पुर्वसंमती मिळालेल्या शेतकर्यांनी बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून ट्रॅक्टर किंवा इतर यंत्र खरेदी करताना स्वत:च्या बॅन्क खात्यातून इलेक्ट्रॉनिक पध्दतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक राहील.

 

९. साहित्य प्रकल्पस्थळी पुरवठा झाल्यानंतर खरेदीची पावती/ बिले, विक्रेत्यास अदा केलेल्या रकमेबाबत अर्जदाराचे बँक खाते पुस्तकातील संबधित नोंद असलेल्या पानाची प्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अपलोड करणे व ऑनलाईन अनुदान मागणी करणे.

 

१०. ट्रॅक्टर खरेदीनंतर अनुदान मागणीसाठी वाहन नोंदणी प्रमाणपत्राची प्रत (आर सी) अपलोड करणे बंधनकारक राहील.

 

११. कृषी यंत्रे/औजारे याविषयी अधिक माहिती केंद्र शासनाच्या http://farmech.dac.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अनुदानास पात्र असलेल्या ट्रॅक्टर व पॉवर टीलरच्या मॉडेल्सची / मेकची यादी केंद्र शासनाच्या सदर संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे. अनुदान अदायगीसाठी सदर यादीतील ट्रॅक्टर व पॉवर टीलर आणि इतर औजारे यांच्या तपासणी प्रमाणपत्राची (Test Report) आवश्यकता नाही. जर लाभार्थ्याने याव्यतिरिक्त यादीतील औजारे खरेदी केल्यास त्यांची तपासणी केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सूचना मध्ये नमूद केलेल्या तपासणी केंद्रामार्फत (Testing Centre) करून घेण्याची जबाबदारी संबधित उत्पादकाची/पुरवठादाराची राहील. अशाप्रकरणी तपासणी प्रमाणपत्र अनुदान मागणी करतेवेळी आवश्यक कागदपत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्यात यावे.

 

१२. कृषी यंत्रे/औजारे खरेदीनंतर सदर यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण घेणे तसेच सेवा पुरवठादाराकडून देखभाल दुरुस्तीबाबत प्राथमिक माहिती घेऊन अधिकच्या माहितीसाठी अथवा येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणेसाठी सेवा पुरवठादाराचा संपर्क तपशील स्वःताकडे ठेवणे.

 

१३. ट्रॅक्टर/कृषी यंत्रे/औजारे खरेदीनंतर सदर यंत्राद्वारे स्व:ताच्या शेतामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे तसेच मागणीनुसार इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर सेवा पुरवठा करणे.

१४. अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या यंत्राचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर/हस्तांतरण होणार नाही याची दक्षता घेणे, यंत्राचा लाभ घेतल्यापासून प्रकल्प कालावधीपर्यंत किंवा किमान ३ वर्षापर्यंत सदर यंत्र हस्तांतरीत करता येणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. सदर अटीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास लाभधारकाकडून प्रकल्पांतर्गत मिळालेल्या अर्थसहाय्याची रक्कम व्याजासहित वसुल करण्यात येईल.

 

 

मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना मध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना ची लाभार्थी यादी ही आता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना च्या माध्यमातून ट्रॅक्टर साठी अर्ज केलेला असेल आणि जर तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला एसेमेस प्राप्त झालेला असेल. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

 

Leave a Comment